लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला सहा दिवस उलटूनही केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला अटक झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने तंबी दिल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी (Uttar Pradesh Police) आशिष याला दुसऱ्यांदा समन्स बजावले होते. अखेर आशिष या मागील दाराने पोलिसांसमोर आज चौकशीसाठी हजर झाला.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याने गदारोळ सुरू आहे. आशिष याला काल समन्स बजावूनही आज तो पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहिला नव्हता. यामुळे तो नेपाळमध्ये पळून गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर मंत्री अजय मिश्रा यांनी खुलासा केला होता. ते म्हणाले होते की, माझ्या मुलाला चौकशीसाठी बोलावले होते परंतु, प्रकृतीच्या कारणास्तव आज तो जाऊ शकला नाही. आता तो उद्या चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर होईल. माझा कायद्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा मुलगा निष्पाप आहे.
लखीमपूर खीरीतील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आशिष हा चौकशीसाठी हजर झाला. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असल्याने पोलिसांनी त्याला मागील दाराने आतमध्ये घेतले. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आशिष यांची चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली ही 9 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. काल हेच उपेंद्र अगरवाल तीन तास आशिष हा चौकशीसाठी येईल या आशेवर वाट पाहत कार्यालयात बसले होते.
मंत्र्याच्या मुलाला अद्याप अटक न झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानेही आज तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी पुन्हा आधीचाच पाढा गिरवला होता. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रांच्या लखीमपूर खीरीतील घरावर पोलिसांनी काल पुन्हा नोटीस चिकटवली. त्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने चौकशीसाठी हजर राहावे, अशी ही नोटीस होती. दरम्यान, एक दिवस आधीही सर्वोच्च न्यायालयाने या मुद्द्यावर उत्तर प्रदेश सरकारला झापले होते. त्यामुळे त्यादिवशीही पोलिसांनी मिश्रांच्या घरावर नोटीस चिकटवली होती.
काल मिश्रांच्या घरावर दुसरी नोटीस चिकटवण्यात आली. आधीच्या नोटिशीत त्याला काल चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. अटकेच्या भीतीने तो चौकशीला हजर राहिला नव्हता. आता दुसऱ्या नोटिशीनुसार त्याला आज सकाळी 9 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. उद्या त्याच्यावर पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी लव कुश आणि आशिष पांडे या दोघांनी अटक करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.