NDA Government : 'एनडीए'तील मित्रपक्षाने सोडली भाजपची साथ, दिला 'एकला चलो'चा नारा

Delhi politics latest news: केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी त्यांचा पक्ष HAM दिल्ली विधानसभा निवडणुक स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे
Amit Shah, Narendra Modi
Amit Shah, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांनी त्यांचा पक्ष HAM दिल्ली विधानसभा निवडणुक स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. यापूर्वी, भारतीय जनता पक्ष दिल्लीतील काही विधानसभेच्या जागा आपल्या मित्रपक्षांना देऊ शकतो, असं बोल जात होत. मात्र साध्य तरी भाजप जीतन राम मांझी यांच्या पक्षाला सोबत घेण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाही. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत जीतन राम मांझी यांनी 'एकला चलो'चा नारा दिला आहे. 

HAM पक्ष उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. HAM पक्षांकडून दिल्ली निवडणुकांबाबत भाजप नेतृत्वाशी अनेक वेळा संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आले असल्याचे सागितले आहे. 

दिल्लीत 25 डिसेंबरला झालेल्या एनडीएच्या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाली. यावेळी हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विजयाबद्दल अभिनंदनही करण्यात आले. झारखंडचा ही उल्लेख करण्यात आला. या ठिकाणी एनडीएच्या घटक पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने मित्रपक्षांच्या बड्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. मात्र निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपने केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

Amit Shah, Narendra Modi
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुखांच्या हत्येविरोधातील एल्गारात शरद पवारांनंतर हा नेता होणार सहभागी

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जेडीयूला दोन आणि लोक जनशक्ती पक्षाला एक जागा दिली होती. बुरारी आणि संगम विहार या जागांवर जेडीयूने तर सीमापुरीच्या जागेवर लोक जनशक्ती पक्षाने निवडणूक लढवली होती. 

मात्र,  जेडीयू आणि एलजेपीला एकही जागा जिंकता आली नाही. जेडीयूला केवळ 84 हजार मते म्हणजे 0.91 टक्के आणि एलजेपीला केवळ 33 हजार म्हणजे 0.35 टक्के मते मिळाली होती. त्यामुळे यंदा भाजप मित्र पक्षला जागा सोडण्याच्या मानसिकते मध्ये नाही. 

Amit Shah, Narendra Modi
Sonu Sood : "सोनू सूद म्हणतो , 'मला इंटरेस्ट नव्हता म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची ऑफर नाकारली'"  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com