शिंदे राजघराण्यातील वाद चव्हाट्यावर; भाचा विरुद्ध आत्या संघर्ष!

केंद्रीय मंत्रिमंडळात जोतिरादित्य शिंदे हे सर्वांत श्रीमंत मंत्री आहेत. आता ते कौटुंबिक वादामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.
Jyotiraditya Scindia, Vasundhara Raje and Yashodhara Raje
Jyotiraditya Scindia, Vasundhara Raje and Yashodhara Raje File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet) जोतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) हे सर्वांत श्रीमंत मंत्री आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार पाडून कमळ फुलवल्याने शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचे बक्षीस मिळाले होते. आता जोतिरादित्य शिंदे हे कौटुंबिक वादामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. राजमाता विजयाराजे शिंदे (Rajmata Vijayaraje Scindia) यांची जयंती वेगवेगळ्या दिवशी साजरी करण्याचे कारण यामागे आहे.

मागील काही दिवसांपासून जोतिरादित्य आणि त्यांच्या आत्या यशोधराराजे (Yashodhara Raje) आणि वसुंधराराजे (Vasundhara Raje) यांच्या यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हे तिघेही आता भाजपमध्ये आहेत. जोतिरादित्य यांनी विजयाराजे यांची जयंती 12 ऑक्टोबरला ग्वाल्हेरमध्ये साजरी केली. त्यावेळी दोन्ही आत्या या कार्यक्रमाला पिरकल्या नाहीत. विजयाराजे हा भारतीय जनसंघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. त्यामुळे भाजपसाठीही हा कार्यक्रम महत्वाचा असतो. भाजपचे अनेक मंत्री आणि बडे नेतेही त्यावेळी उपस्थित होते.

नंतर यशोधराराजे यांनी विजयाराजे यांच्या जयंतीचा वेगळा कार्यक्रम 24 ऑक्टोबरला आयोजित केला. या कार्यक्रमाला जोतिरादित्य उपस्थित राहिले नव्हते. या कार्यक्रमाला जोतिरादित्य यांचे समर्थक मंत्री आणि नेतेही उपस्थित राहिले नाहीत. यामुळे शिंदे परिवारातील आता चव्हाट्यावर आला आहे. यशोधरा राजे या मध्य प्रदेशमध्ये मंत्री आहेत. परंतु, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि मंत्री भारतसिंह कुशवाह यांच्याशिवाय इतर मंत्री उपस्थित नव्हते. याचवेळी बहिणीने आयोजित केलेल्या जयंतीला वसुंधरा राजे मात्र आवर्जून उपस्थित होत्या.

Jyotiraditya Scindia, Vasundhara Raje and Yashodhara Raje
अच्छे दिन! पेट्रोलपेक्षा आता बिअर झाली स्वस्त

शिंदे यांनी 22 समर्थक आमदारांसह मागील वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार कोसळले होते. नंतर शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार राज्यात सत्तेत आले. त्यावेळी त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले होते. राज्यात सत्तांतर घडवणाऱ्या जोतिरादित्य शिंदेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. त्यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाची धुरा सोपवण्यात आली. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात 2009 ते 2012 मध्ये शिंदे हे केंद्रात वाणिज्य व उद्योग मंत्री होते. नंतर 2012 ते 2014 मध्ये त्यांच्याकडे ऊर्जा मंत्रालय होते. काँग्रेसच्या 2019 मधील लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे हे भाजपमध्ये दाखल झाले होते. नंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.

Jyotiraditya Scindia, Vasundhara Raje and Yashodhara Raje
मोठी घडामोड : एनसीबीनं तातडीनं समीर वानखेडेंना दिल्लीत बोलावलं

मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात सर्वांत श्रीमंत मंत्री जोतिरादित्य शिंदे असून, महाराष्ट्रातील नारायण राणे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, अशी माहिती असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालातून समोर आली आहे. नव्या मंत्रिमंडळात 70 मंत्री (90 टक्के) करोडपती आहेत. प्रत्येक मंत्र्याची सरासरी संपत्ती 16.24 कोटी रुपये आहे. जोतिरादित्य शिंदे, पीयूष गोयल, नारायण राणे आणि राजीव चंद्रशेखर या चार मंत्र्यांची संपत्ती 50 कोटी रुपयांहून अधिक आहे. सर्वांत श्रीमंत मंत्री जोतिरादित्य शिंदे आहेत. त्यांची संपत्ती 379 कोटी रुपये आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com