जलपैगुडी : पश्चिम बंगालमध्ये (West Benal) गुवाहाटी-बिकानेर एक्स्प्रेस (Guwahati-Bikaner Express) लोहमार्गावर घसरून काल (ता.13) भीषण अपघात (Railway Accident) घडला होता. या अपघातात रेल्वेचे 12 डबे लोहमार्गावरून घसरले होते. यात 9 जण ठार तर 36 जण जखमी झाले. रेल्वे मंत्रालयाने (Railway Ministry) अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रूपयांची नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेमंत्र्यांनीही आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) हे स्वत: परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. या अपघाताबद्दल आणि मदत कार्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहिती दिली होते. बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसला काल सायंकाळी हा अपघात घडला होता. रेल्वेचे 12 डबे लोहमार्गावरून खाली घसरले होते. वैष्णव यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पाहणी केली. त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
या वेळी वैष्णव यांनी रेल्वे अपघाताचे प्राथमिक कारण इंजिनमधील बिघाड असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, प्रथमदर्शनी इंजिनमधील बिघाडामुळे हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. रेल्वे सुरक्षा आयोग या अपघाताची चौकशी करीत आहे. ते चौकशी करून यामागील नेमके कारण शोधतील. मृतांच्या कुटुंबीयांनी मदतीचे वाटप आम्ही सुरू केले आहे. पंतप्रधान मोदी हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मी त्यांच्या कायम संपर्कात आहे. सर्व जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना मी करतो.
या अपघाताच्या चौकशीसाठी रेल्वेने उच्चस्तरीय समितीची घोषणा केली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि महासंचालक (सुरक्षा) हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रूपयांची नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे. गंभीर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली .
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.