IPS Transfer : सरकारचा मोठा सर्जिकल स्ट्राईक! 12 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

IPS Transfer List 12 Officers Transferred : 12 बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोणत्या अधिकाऱ्याची कुठे नियुक्ती झाली? पाहा IPS अधिकाऱ्यांची संपूर्ण बदली यादी.
Rajasthan ips .jpg
Rajasthan ips .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

उत्तर प्रदेशच्या पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने 2024 आणि 2025 बॅचमधील 12 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयानुसार, नव्या अधिकाऱ्यांना राज्यातील विविध जिल्हे आणि पोलीस कमिश्नरेटमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. गोरखपूर, लखनऊ, वाराणसी आणि गाझियाबाद यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या प्रशासकीय बदलांमुळे उत्तर प्रदेशातील पोलीस यंत्रणेच्या कामकाजात नव्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी जाऊन आपापल्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहेत. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार कोणत्या अधिकाऱ्याची कुठे नियुक्ती झाली आहे, याची सविस्तर माहिती समोर आली आहे.

Rajasthan ips .jpg
Ambadas Danve : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ल्याची अंबादास दानवेंकडून खिल्ली; तुम्हाला कोण मारणार? म्हणत केला प्रश्नांचा भडीमार!

कोणत्या IPS अधिकाऱ्याची कुठे बदली?

उत्तर प्रदेश सरकारच्या नव्या नियुक्ती आदेशानुसार, अभिषेक अंजनी सिंह यांची गोरखपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य आचार्य यांना वाराणसी पोलीस कमिश्नरेटची जबाबदारी देण्यात आली आहे. अक्षत मंडिवाल यांची जौनपूर येथे, तर आयेंद्र कुमार यांची गाझियाबाद पोलीस कमिश्नरेटमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

पाहा 12 IPS अधिकाऱ्यांची संपूर्ण बदली यादी

1. अभिषेक अंजनी सिंह – गोरखपूर

2. आदित्य आचार्य – वाराणसी कमिश्नरेट

3. अक्षत मंडिवाल – जौनपूर

4. आयेंद्र कुमार – गाझियाबाद कमिश्नरेट

5. के. अर्पिता – हरदोई

6. काशिश कालरा – कानपूर देहात

Rajasthan ips .jpg
Amit Shah Pune Visit : अमित शहांच्या पुणे दौऱ्यात राष्ट्रवादीला प्राधान्य; मुरलीधर मोहोळांच्या मॅरेथॉनचे उद्‍घाटन मात्र दौऱ्यातून वगळले

7. कुणाल कुमार – प्रतापगड

8. कुणाल यादव – सहारनपूर

9. राजेंद्र बिश्नोई – एटा

10. शिवांक चौधरी – लखनऊ कमिश्नरेट

11. सृष्टी मिश्रा – मथुरा

12. योगेंद्र मीणा – सीतापूर

दरम्यान, 2024 आणि 2025 बॅचच्या या 12 IPS अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनात महत्त्वाचे बदल झाले आहेत. नव्या ठिकाणी हे अधिकारी कोणत्या पद्धतीने कामकाजाची जबाबदारी सांभाळतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.