Ambadas Danve : पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ल्याची अंबादास दानवेंकडून खिल्ली; तुम्हाला कोण मारणार? म्हणत केला प्रश्नांचा भडीमार!

संजय शिरसाट यांच्या घरावरील हल्ल्याची अंबादास दानवे यांनी खिल्ली उडवली. 'तुम्हाला कोण मारणार?' असा सवाल करत त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. नेमकं काय म्हणाले दानवे?
Ambadas Danve
Ambadas DanveSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shivsena UBT : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर तीन मद्यधुंद तरूणांनी रात्री धिंगाणा घालत बाटल्या फेकल्या. यावरून जिल्ह्यातील राजकारण तापले असून शिरसाट यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनाच टार्गेट केले आहे. शिरसाट यांनी रात्री घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्तांना फोन केला तेव्हा तो बंद आला. यावरून ते वसुलीत लागले आहेत, त्यांना क्रीम पोस्ट हवी आहे, असे खळबळजनक आरोप त्यांनी केला.

मग या वादात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उडी घेत संजय शिरसाट यांच्यावरच त्यांच्याकडून शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांना पाठबळ दिले जात असल्याचा आरोप केला. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्या घरावर बाटल्या फेकल्यानंतर होत असलेल्या हल्ल्याच्या चर्चेची खिल्ली उडवली. शिरसाट रस्त्यावर उभे राहिले तर फुकटही त्यांना कोणी मारणार नाही, असा टोला दानवे यांनी लगावला.

Ambadas Danve
EV Purchase Rule : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारचा नवा नियम लागू; EV खरेदी अनिवार्य, 'इतक्या' लाखांपर्यंत मिळणार लाभ

दानवे एवढ्यावच थांबले नाहीत तर त्यांनी शिरसाट यांच्या बंगल्यावर झालेल्या बाटली फेकीच्या प्रकारावर संजय शिरसाट आणि पोलीस आयुक्तांना काही प्रश्न विचारत दोघांचीही कोंडी केली आहे. सो कॉल्ड हल्ल्याची चर्चा ठीक आहे. पण काही साधे प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे पोलीस आयुक्त आणि पालकमंत्र्यांनी द्यायलाच हवीत!

१. हेच पोलीस सर्वसामान्य नागरिकांसह मंत्री महोदयांच्या कुटुंबीयांनाही सुरक्षा देतात. मग या पोलिसांच्या संरक्षण व्यवस्थेत नेमकी कसली आणि कुठे त्रुटी आहे, हे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट करावे!

२. मंत्री महोदयांना Y+ दर्जाची सुरक्षा वगैरे-वगैरे असताना काही मुलं थेट त्यांच्या घरापर्यंत पोहोचतात कशी? मग या सुरक्षेचा नेमका उपयोग काय?

Ambadas Danve
Gokul Politics : चेअरमनने काय बोलावं, संचालकांनी कुठे बसावं? गोकुळच्या अध्यक्षपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या संचालकांची धडपड चर्चेत

३. चाबुकस्वार आणि जैस्वाल यांच्यासारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पालकमंत्री महोदयांचा एवढा कथित वरदहस्त का? त्यांना मिळणाऱ्या या कथित राजकीय अभयामागचे नेमके कारण काय?

४. पोलिसांच्या बदल्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या कुटुंबीयांचाही कथित हस्तक्षेप होत असेल, तर पोलीस दलाने हे किती काळ सहन करायचे? पोलिसांच्या प्रशासकीय स्वायत्ततेचा असा खेळ मांडण्याचा अधिकार नेमका कुणी दिला?

हल्ल्याच्या चर्चेपेक्षा या प्रश्नांची उत्तरे अधिक महत्त्वाची आहेत. कारण प्रश्न केवळ एका हल्ल्याचा नाही, तर पोलीस दलाची स्वायत्तता, कायद्याचे राज्य आणि सत्तेच्या गैरवापराचा आहे, असे दानवे यांनी म्हटले आहे. तब्बल '३३ देशांनी' दखल घेतलेले मंत्री शिरसाट यांच्या घरावरील हल्ला हा राज्याच्या गृहखात्याची भीती कितपत उरली आहे हे दाखवतो. राज्यात मंत्र्यांच्या घरांवर, सिने अभिनेत्यांच्या गाड्यांवर गोळीबार होतो मग सामान्य माणसाची अवस्था काय, यावर फार न बोललेले बरे! ज्या सरकारला त्यांच्या मंत्र्यांचे घरं राखता येत नसतील ते लोकांना काय आधार देणार, अशी टीकाही दानवे यांनी काल केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.