Akhilesh Yadav अडचणीत ; निवडणूक आयोगाची नोटीस, पुरावे सादर करा..

Notice To Akhilesh Yadav : मुस्लिम समाजातील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात काढून टाकले , असा आरोप अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.
Akhilesh Yadav Latest Marathi News
Akhilesh Yadav Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

Notice To Akhilesh Yadav : निवडणूक आयोगावर आरोप करणं समाजवादीचे पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना महागात पडणार असल्याचे चित्र आहे.

निवडणूक आयोगाने त्यांच्यावर केलेल्या आरोपांवरील पुरावे, कागदपत्रे अखिलेश यादव यांच्याकडे मागितले आहेत, यादव हे पुरावे देतील का, निवडणूक आयोग त्यांच्यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

स्थानिक स्वराज निवडणुकीत व्यग्र असलेले अखिलेश यादव यांच्या अडचणीत यामुळे वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत येत्या १० नोव्हेंबर रोजी त्यांना पुरावे सादर करण्यास निवडूक आयोगाने सांगितले आहे. याबाबत आयोगाने यादव यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे पुरावे मागितले आहेत.

Akhilesh Yadav Latest Marathi News
Devendra Fadnavis कटुता संपवा, कामाला लागा ; ठाकरे गटाकडून साद

निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेश विधान सभेच्या निवडणुकीत यादव आणि मुस्लिम समाजातील मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात काढून टाकले होते, असा आरोप एका कार्यक्रमात अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हा आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या आरोपाबाबत आता निवडणूक आयोगाने यादव यांच्याकडे पुरावे मागितले आहेत.

कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून २० हजार मतदारांची नावे हटविल्याची तक्रार आलेली नाही. जर असे घडले असेल तर त्याबाबत त्यांनी पुरावे सादर करावे, असे आयोगाने त्यांना पाठवलेल्या नोटिशीत म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com