

New dehli News : दोन वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले होते. त्यानंतर पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने सत्तेत येण्याची हॅट्ट्रिक केली. त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता आली. महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही भाजपने मोठे यश मिळवले. त्यानंतर पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपने तृणमूल काँग्रेसला पराभवाची धूळ चारली होती. आता लवकरच उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्यापूर्वीच भाजपला मोठा धक्का बसला आहे.
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या दोन बड्या नेत्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पक्ष सोडताच या दोन नेत्यानी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही नेत्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या दोन माजी आमदारासोबतच भाजपसोबतच बसपाच्या काही नेत्यांनी देखील सपामध्ये प्रवेश केला आहे.
उत्तर प्रदेशमधील दातागंज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि भाजप नेते सिनोद शाक्य यांनी भाजपची (Bjp) साथ सोडत समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबतच बिसौली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार कुशाग्र सागर यांनी देखील समाजवादी पक्षात प्रवेश केला. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही नेत्यांनी समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
प्रवेशावेळी शिवपाल सिंह यादव आणि बदायू लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदित्य यादव यांची देखील उपस्थिती होती. सिनोद शाक्य हे 2007 आणि 2012 असे दोनदा बसपाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. पंरतु 2022 मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला, दरम्यान त्यांनी आता भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सपामध्ये प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.