BJP leader father murder : भाजप नेत्यांच्या वडिलांची क्रूरपणे हत्या : तोंडात कागद कोंबले, डोळेही फोडले

BJP leader crime news today shocking murder details : धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपा नेत्याच्या वडिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली असून पोलिस तपास सुरू आहे.
Beed crime news
Beed crime newsSarkarnama
Published on
Updated on

उत्तर प्रदेशातील अलीगड जिल्ह्यातील चिलकौरा नगरिया गावात एक अतिशय धक्कादायक आणि अमानुष घटना समोर आली आहे. भाजप युवा मोर्चाचे मंडळ मंत्री पंकज राजपूत यांचे वडील आणि पेट्रोल पंप चालक नरोत्तम राजपूत (वय 55) यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

नरोत्तम राजपूत हे ‘सिटी एनर्जी’ नावाचा पेट्रोल पंप चालवत होते. तसेच त्यांचे कौडियागंज परिसरात तीन विटभट्टीही होते. मंगळवारी सकाळी सुमारे 10 वाजता ते त्यांच्या पत्नी पूनम यांच्यासोबत शेतात जनावरांसाठी चारा कापत होते. त्याचवेळी कन्हैया नावाचा त्यांचा ओळखीचा व्यक्ती तिथे आला आणि त्याने स्कूटीवर चिलकौरा पर्यंत सोडण्याची विनंती केली.

Beed crime news
Vidhan Parishad BJP Candidates : भाजपने विधानपरिषदेचा प्लॅन बदलला : 6 पैकी 2 जागांवर महिलांना संधीची शक्यता; एक नाव फिक्स?

दोघेही एका बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ पोहोचले. तेथे काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढताच कन्हैयाने आपल्या साथीदारांच्या मदतीने नरोत्तम यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरण्यात आला. इतक्यावरच न थांबता हल्लेखोरांनी त्यांच्या तोंडात कागद कोंबला आणि डोळेही फोडले. त्यानंतर मृतदेह त्या अपूर्ण घरात टाकून आरोपी पळून गेले.

दुपारपर्यंत नरोत्तम घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबीयांनी शोध सुरू केला. संशय आल्याने त्यांनी आरोपींकडे चौकशी केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर बांधकाम सुरू असलेल्या घराचे कुलूप उघडल्यावर रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. हे दृश्य पाहून कुटुंबीयांचा थरकाप उडाला.

Beed crime news
BJP leader : भाजप नेत्याला बलात्काराच्या आरोपातून 'क्लीन चिट'! नेमकं प्रकरण काय?

घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अनेक पोलीस ठाण्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. संतप्त नागरिकांनी आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी करत जवळपास 2 तास मृतदेह उचलू दिला नाही. पोलिसांनी समजूत काढल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेतला.

या प्रकरणात मुख्य आरोपी कन्हैया फरार असून, त्याच्या दोन भावांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. मात्र या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com