Rahul Gandhi News : माजी खासदार लेक भाजपमध्ये, पाचवेळा आमदार राहिलेल्या वडिलांची थेट राहुल गांधींसोबत हातमिळवणी

Swami Prasad Maurya, Sanghmitra Maurya, Apni Janta Party : राज्यात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी निश्चित मानली जात आहे. मात्र, स्वामी प्रसाद मोर्य यांच्या काँग्रेससोबतच्या एन्ट्रीने हे समीकरण बिघडण्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
Swami Prasad Maurya met Rahul Gandhi as his Apni Janta Party joined the INDIA bloc.
Swami Prasad Maurya met Rahul Gandhi as his Apni Janta Party joined the INDIA bloc.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

INDIA Alliance Uttar Pradesh : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसह विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनेही कंबर कसली आहे. जागावाटपासह उमेदवारांची जुळवाजुळवही सुरू करण्यात आली आहे. त्यातच सोमवारी राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे.

राज्यातील मातब्बर नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी आणि खासदार प्रियांका गांधी यांना भेटल्याचे फोटो सोशल मीडियात पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपच्या माजी खासदार संघमित्रा मौर्य या स्वामी यांच्या कन्या आहेत. त्या भाजपमध्येच सक्रीय असून वडिलांचा अपनी जनता पार्टी हा स्वतंत्र पक्ष आहे. स्वामी यांनी राहुल गांधी यांच्यासोबचा फोटो पोस्ट करत राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नव्या समीकरणाचे संकेत दिले आहेत.

राज्यात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसची आघाडी निश्चित मानली जात आहे. मात्र, स्वामी प्रसाद मोर्य यांच्या काँग्रेससोबतच्या एन्ट्रीने हे समीकरण बिघडण्याची चर्चा आता सुरू झाली आहे. स्वामी यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपला सोडचिठ्ठी देत सपामध्ये प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकत स्वत:चा पक्ष निर्माण केला होता. यादरम्यान ते सातत्याने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर टीका करत आहेत.

Swami Prasad Maurya met Rahul Gandhi as his Apni Janta Party joined the INDIA bloc.
Supreme Court news : निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टात झटका; Form 6 बाबत सरन्यायाधीशांनीच पाडले तोंडावर

काँग्रेसकडूनही आघाडीमध्ये अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. स्वामी यांच्यासोबतची हातमिळवणी त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे. स्वामी हे पाचवेळा आमदार होते. बहुजन समाज पक्ष, भाजप आणि समाजवादी पक्ष फिरून ते आता काँग्रेससोबत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

Swami Prasad Maurya met Rahul Gandhi as his Apni Janta Party joined the INDIA bloc.
Supreme Court news : निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टात झटका; Form 6 बाबत सरन्यायाधीशांनीच पाडले तोंडावर

स्वामींच्या कन्या संघमित्रा या २०१९ मध्ये बदायू लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. मात्र, २०२४ मध्ये पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. पण त्यानंतरही त्या भाजपमध्ये कार्यरत आहेत. तर वडिलांनी वेगळा मार्ग निवडला आहे. आता त्यांनी काँग्रेससोबत जवळीक वाढविल्याने चर्चांना उधाण आले आहे. लेकीला विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी स्वामी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता संघमित्रा मौर्य काय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com