Pooja Khedkar News : 'यूपीएससी'चा पूजा खेडकरवर गंभीर आरोप

Political News : दिल्ली हायकोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान युपीएससीच्या वकीलांनी आरोप केला आहे. 31 जुलै रोजी युपीएससीनं पत्रक काढून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती, शिवाय भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नसल्याचे ई मेलमधून कळवले होते.
IAS Pooja khedkar
IAS Pooja khedkarSarkarnama
Published on
Updated on

New delhi News : पूजा खेडकर हिच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पूजा खोटं बोलत असल्याचा आरोप यूपीएससीने केला आहे. पूजा खेडकर खोटं बोलत असल्याचा युपीएससीचा आरोप आहे. पूजा खेडकरनं कोर्टासमोर खोटी माहिती दिली आहे.

दिल्ली हायकोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान यूपीएससीच्या वकीलांनी आरोप केला आहे. 31 जुलै रोजी युपीएससीनं पत्रक काढून पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती, शिवाय भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नसल्याचे ई मेलमधून कळवले होते. परंतु, तो ई मेल मिळाला नसल्याचा दावा पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी कोर्टात केला होता. (Pooja Khedkar News)

यावर येत्या तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश पूजा खेडकरला हायकोर्टाने दिले आहेत. पुढील सुनावणी 26 नोव्हेंबरला होणार आहे. युपीएससी तर्फे नरेश कौशिक यांनी युक्तीवाद केला.

पूजा खेडकरनं खोटी साक्ष दिल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. पूजा खेडकरवर यूपीएससी (UPSC) परीक्षा पास होण्यासाठी ओबीसी आणि दिव्यांग कोट्यातील आरक्षणाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या सुनावणीवेळी कोर्ट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IAS Pooja khedkar
Supriya Sule : संसदेत राष्ट्रवादीला कार्यालय मिळताच सुप्रिया सुळेंनी दाखवले 'मेरीट'

दरम्यान, अपंगत्वाच्य बनावट प्रमाणपत्राद्वारे यूपीएससीतून IAS केडर मिळवणाऱ्या पूजा खेडकरला केंद्र सरकाने मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने पूजा खेडकरला प्रशासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. न्यायालयाने पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिले होते. 26 सप्टेंबरला पूजाच्या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार होती.

केंद्र सरकारने मात्र दुसरीकडे कारवाई करत पूजाला बडतर्फ केले. दिव्यांग प्रमाणपत्र सादर करत पूजाने IAS केडर मिळवले होते. तसेच नावात बदल करून तिने अनेकदा यूपीएससीची परीक्षा दिल्याचा आरोप देखील पूजावर आहे.

IAS Pooja khedkar
Sunil Kedar News : निवडणुकीच्या तोंडावर सुनील केदारांची सावध भूमिका कशासाठी ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com