UPSC Result News: UPSCमध्ये महाराष्ट्रातील 60 हून अधिक विद्यार्थ्यांनी मारली बाजी; पहिल्या 100 मध्ये 5 विद्यार्थी; 'या' पदांवर होणार रूजू

UPSC Civil Services Result 2025: यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील 60 हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून पहिल्या 100 मध्ये महाराष्ट्रातील 5 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले आहे.
UPSC Civil Services Result 2025
UPSC Civil Services Result 2025Sarkarnama
Published on
Updated on

UPSC civil services result, Maharashtra students: केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षा -2025 चा निकाल लागला असून यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

देशातील एकूण 958 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यात राज्यातील 60 हून अधिक उमदेवारांचा समावेश आहे. अनुज अग्निहोत्री हा देशात पहिला आला असून, पहिल्या १०० उमेदवारांमध्ये पाच जणांचा समावेश आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या वर्ष 2025 च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. ऋषीकेश आलासे 61 ,आकाश त्रिवेदी यांनी 73, गौरव चोपडा यांनी 83, सायली पगार यांनी 87, वा तर दिक्षा पाटकर यांनी 88 वा क्रमांक पटकावला आहे.

यशस्वी उमेदवारांची यादी

हृषीकेश आलासे (६१) आकाश त्रिवेदी (७३) गौरव चोप्रा (८३) सायली पगार (८७), दीक्षा पाटकर (८८), ऋतुजा गायकवाड (१०६), वरुण टोकस (११७), अंकिता अनिल पाटील (१४०), आर्यन सिरसीकर (१७५), कार्तिक बच्छाव (१७७), राहुल पाटील (२२४), शुभम शरद बेहेरे (२२६), ऋषिकेश पालिमकर (२८३), मोहिनी जगताप (३२३), अभिषेक ओझार्डे (३३६), हर्षवर्धन पाटील (३४९), हर्षवर्धन तिडके (३५५), कुणाल अहिरराव (४३०), अभिषेक मगदूम (४४९), धनश्री अहिरे (४८९), मनोज पाटील (४९३), विशाखा कदम (५०४), नंदिनी पाटील (५१२), रजत वाळके (५१४), निखिल तांबे (५१७), श्रुती चव्हाण (५२७), धनंजय दिघे (५२९), संकेत कुंभार (५३९), साईराज पाटील (५४५), आरुषा पाटील (५५३), पारस मिस्त्री (५५५), बापूसाहेब गायकवाड (५६१), प्रवीण कोळपे (५८४), अविष्कार डेर्ले (५९१), रोहित माळवेकर (६०१), अभिषेक टेकाडे (६१०), सिद्धार्थ तागड (६१९), भाग्यश्री नायकेले (६४७), शिवम वखारे (६५१), पांडुरंग कांबळी (६६०), अश्विनी कोळेकर (६७५), प्रज्वल नासरे (६७७), अल्पेश ढवळे (६८७), सूरज सूर्यवंशी (७०२), रामेश्वर शिंदे (७०५), बसवराज पाटील (७३९), प्रीतकुमार भाले (७४२), राजश्री देशमुख (७५४), चेतन ठाकरे (७६२), प्रांजली मेश्राम (७६७), मनीष झेंडे (७८८), प्रथमेश शिंदे (८१७), राहुल चांडोलकर (८३१), हेमकृष्ण पिसाडे (८४९), अतुल राजुरकर (८६३), रोहित सांगळे (८६५), सुरेश बोरकर (९१२), प्रेरणा खवले (९१३), अनिकेत अहिरे (९४१)

UPSC Civil Services Result 2025
ACB Raid News: GSTचा मोठा 'मासा' ACBच्या जाळ्यात! राज्यभरातील कार्यालयांमध्ये खळबळ

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी ऑगस्ट 2025 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली. डिसेंबर 2025- फेब्रुवारी 2026 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 958 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –317, आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 104, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) - 306, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) - 158, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 73 उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 258 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- 129, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 26, इतर मागास वर्ग -86, अनुसूचित जाती- 08, अनुसूचित जमाती - 06 उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण तीन दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

UPSC Civil Services Result 2025
Gokul Dudh Sangh Election: गोकुळ निवडणुकीच्या तोंडावर सतेज पाटलांना धक्का; 'हा' बडा नेता लागला मुश्रीफांच्या गळाला

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 74, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 18इतर मागास वर्ग (ओबीसी) –47, अनुसूचित जाती (एससी) – 28, अनुसूचित जमाती (एसटी) 13 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण – 55 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 22, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 06, इतर मागास वर्ग (ओबीसी) – 15, अनुसूचित जाती (एससी) – 08, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 04 जागा रिक्त आहेत.

UPSC Civil Services Result 2025
Maharashtra Police: जिथं भांडी घासली तिथंच खाकी वर्दीत सत्कार झाला! वेटर ते PSI: संग्राम मळकर यांची संघर्षगाथा तुम्हाला माहीत आहे का?

भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण – 150 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 15, इतर मागास प्रवर्गातून - 42, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 22, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 11 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - 507 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 211, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 48 , इतर मागास प्रवर्गातून -141, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 73 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –34 उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – 195 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 79, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 17 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - 61, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 27 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -11 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण 348 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com