US Court Summon : हत्येच्या कटाचं प्रकरण; मोदी सरकारसह अजित डोवाल यांना अमेरिकेतील कोर्टाचं समन्स

Indian Government Ajit Doval Gurpatwant Singh Pannun : परराष्ट्र मंत्रालयाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आली असून त्यावर चिंता व्यक्त केली आहे.
Narendra Modi, Ajit Doval
Narendra Modi, Ajit DovalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंद सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेतील एका कोर्टाने मोदी सरकारसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना समन्स बजावले आहे. तसेच ‘रॉ’चे माजी अध्यक्ष सामंत गोयल, एजंट विक्रम यादव आणि अमेरिकेतील भारतीय व्यापारी निखील गुप्ता यांचीही त्यात नावे आहेत.

अमेरिकेतील कोर्टाच्या समन्सवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी म्हटले आहे की, 'आम्ही आधी म्हटल्याप्रमाणे, हे पूर्णपणे अनुचित आणि बिनबुडाचे आरोप आहेत.' समन्सला 21 दिवसांत उत्तर द्यावे लागणार आहे.

Narendra Modi, Ajit Doval
IPS Shivdeep Lande : बिहारचे सिंघम IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा मंजूर होणार?

आता हा विशिष्ट खटला दाखल करण्यात आला आहे, त्यामुळे मूळ परिस्थितीबद्दलचे आमचे मत बदलत नाही. मी फक्त या विशिष्ट प्रकरणामागील व्यक्तीकडे तुमचे लक्ष वेधून घेतो, ज्याची पार्श्वभूमी सर्वांना माहिती आहे, असे मिस्त्री यांनी म्हटले आहे.

ही व्यक्ती प्रतिनिधित्व करत असलेली तथाकथित संघटना बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रविरोधी कृत्यांमध्ये सहभाग आणि भारताच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला बाधा आणण्याच्या उद्देशाने विध्वंसक कारवाया करण्याचा या संघटनेचा हेतू असल्याने असे करण्यात आल्याचे मिस्त्री यांनी म्हटले आहे.

Narendra Modi, Ajit Doval
Anna Sebastian Perayil : पुण्यातील महिला कर्मचाऱ्याच्या मृत्यूची मोदी सरकारकडून चौकशी सुरू; कामाच्या ताणामुळे गमावला जीव

दरम्यान, न्यूयॉर्कमध्ये पन्नूच्या हत्येच्या कटात सामील असल्याचे आरोपाखाली निखील गुप्ता यांना मागील वर्षी झेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली आहे. यापूर्वी जून महिन्यात त्यांना अमेरिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. यामध्ये विक्रम यादव यांचा हात असल्याचे वाशिंग्टन पोस्टने एप्रिल महिन्यात दिलेल्या वृत्तात म्हटले होते. समंत गोयल यांनी या ऑपरेशनला संमती दिली होती, असेही वृत्तात नमूद करण्यात आले होते.

केंद्र सरकारने हे वृत्त फेटाळून लावले होते. हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सरकारकडून त्यावेळीही स्पष्ट करण्यात आले होते. पन्नू हा भारतात वॉन्टेड असून त्यांच्याकडे अमेरिकेसह कॅनडाचेही नागरिकत्व आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्याला दहशतवादी म्हणून जाहीर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com