US Attack on Iran Ships : तेलमार्गावरच युद्ध पेटलं! होर्मुझमध्ये सुरुंग पेरणारी इराणची 16 जहाजे उडवली, अमेरिकन सैन्याने कारवाईचा थरारक VIDEO केला शेअर

Strait of Hormuz War Escalation : होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गातून जगभरातील 20 टक्के तेलाची वाहतूक केली जाते. याच मार्गात इराणकडून सुरूंग पेरण्याचे काम सुरू असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. तर यासाठीच आता अमेरिकेकडून मोठी कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे.
Strait of Hormuz attack
US military footage reportedly shows Iranian vessels destroyed near the Strait of Hormuz, a critical route through which nearly 20% of the world’s oil supply passes.Sarkarnama
Published on
Updated on

US Attack on Iran Ships : अमेरिका-इस्राइल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या भयंकर युद्धात आतापर्यंत शेकडो इस्राइल आणि इराणमधील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगावर होताना दिसत आहे. अनेक देशांचा इंधन पुरवठा या युद्धामुळे ठप्प झाला आहे.

दोन्ही राष्ट्रांकडून माघार घेण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नाहीये. अशातच आता या युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण अमेरिकन सैन्याने इराणवरील हल्ल्याचा एक थरारक व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना अमेरिकेने या हल्ल्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ सुरुंग पेरणाऱ्या 16 इराणी जहाजं नष्ट केल्याचा दावा केला आहे. अमेरिकन सैन्याने 10 मार्च रोजी केलेल्या कारवाईचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. ज्यामध्ये काही जहाज नष्ट झाल्याचं दिसत आहे.

Strait of Hormuz attack
Israel Iran War : मोठी बातमी! पहिल्यांदाच अमेरिका-इस्रायलमध्येच मतभेद; इराणच्या 'त्या' भागात हल्ले न करण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश

तर इराणने होर्मुझच्या सामुद्रधानीच्या मार्गात सुरुंग पेरण्यास सुरुवात केल्यामुळे हा हल्ला केल्याचा दावा अमेरिकेने केला. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या मार्गातून जगभरातील 20 टक्के तेलाची वाहतूक केली जाते. याच ठिकाणी इराणकडून सुरूंग पेरण्याचे काम सुरू असल्याचं अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, तेल पुरवठा बंद करुन शत्रू राष्ट्राला एक लिटर तेलही मिळून देणार नाही, अशी धमकी तेहरानने दिली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधानी बंद करण्याचा प्रयत्न केल्यास 20 पट जोरदार हल्ला करु, असा दिला होता.

Strait of Hormuz attack
Supreme Court : सुप्रीम कोर्टात ऐतिहासिक निकाल देताना न्यायमुर्तींच्या डोळ्यात आले पाणी; देशात पहिल्यांदाच आला असा निकाल...

त्यानंतर अमेरिकेच्या सैन्यांनी मंगळवारी सुरुंग पेरणारे 16 इराणी जहाज नष्ट कल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर इराणने पाण्यात स्फोटके पेरली नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com