

Oman ship attack : अमेरिका आणि इराणमध्ये पुन्हा घनघोर युध्द सुरू झाले आहे. इराणने होर्मूजची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर काही तासांत अमेरिकेने इराणमधील तब्बल १४० ठिकाणांवर एकापाठोपाठ एक क्षेपणास्त्र डागली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला चढविला. दुसरीकडे ओमानजवळ भारतीय नागरिक असलेल्या एका व्यापारी जहाजावरही हल्ला झाला आहे.
इराणने अनिश्चित काळासाठी सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जग पुन्हा हादरले आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समझोता होणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. इराणवर हल्ला करण्याचा इशारा देत देत होते. त्यातच इराणने सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेताच अमेरिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
अमेरिकेकडून प्रामुख्याने इराणच्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये इराणला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्यानंतर इराणनेही बहारीन, कुवेत, कतार आणि संयुक्त अरब अमिराती या देशांतील अमेरिकेच्या तळांवर हल्ले केले. त्यामुळे पश्चिम आशियासह जगाला हादरले बसले आहेत. मागील काही दिवसांपासून इराण व अमेरिकेमध्ये समझोत्यावर चर्चा सुरू होत्या. त्याला आता खीळ बसली असून कच्च्या तेलाचे भावही वाढू लागले आहेत.
जहाजावर हल्ला
दरम्यान, रविवारी सकाळी ओमानच्या किनारपट्टीजवळ GFS Galaxy या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताने निषेध केला आहे. या जहाजावर एकूण ११ भारतीय नागरिक होते. त्यापैकी १० जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
ओमानच्या किनारपट्टीजवळ व्यापारी जहाजांवर सातत्याने होत असलेले हल्ले अत्यंत चिंताजनक असल्याचे भारताने म्हटले आहे. तणाव तातडीने कमी करण्याचे आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या चर्चांना लवकरात लवकर यश मिळावे, अशी अपेक्षाही भारताने व्यक्त केली आहे.
व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले तात्काळ थांबले पाहिजेत. कायद्याच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील मुक्त, सुरक्षित आणि कोणत्याही अडथळ्याविना वाहतूक व व्यापार शक्य करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी मागणीही भारताने केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.