Trump Cuba statement : व्हेनेझुएला, इराणनंतर ट्रम्प यांचा आणखी एका देशावर डोळा, कमजोर राष्ट्र म्हणत थेट ताब्यात घेण्याचा दिला इशारा, तिसरं महायुद्ध भडकणार?

Cuba blackout crisis : मागील गेल्या काही महिन्यांपासून क्युबाला तेलाचा मोठा पुरवठा मिळालेला नाही. कारण ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाकडून क्युबाला होणारा पूर्वीचा तेलपुरवठा थांबवला आहे. त्यामुळे आता देशाला इंधन मिळवणे शक्य होत नसल्याने क्युबामध्ये वीजपुरवठा होत नसल्याने संपूर्ण बेट अंधारात बुडाले आहे.
US President Donald Trump speaks at the White House amid the Iran war crisis, as global oil shortages and Cuba tensions intensify.
US President Donald Trump Cuba Statement CrisisSarkarnama
Published on
Updated on

Trump Cuba Statement Crisis : अमेरिका-इस्राइल विरूद्ध इराणमधील युद्ध जवळपास मागील १८ दिवसांपासून सुरू आहे. या युद्धाचा जगभरातील अनेक देशांना फटका बसला आहे. अनेक देशांत तेलाची आणि गॅसची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे हे युद्ध कधी संपणार याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

हे युद्ध थांबवणं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात आहे हे उघड गुपित आहे. मात्र, ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवायचं लांबच मात्र आता आणखी एका देशावर ताबा मिळवण्याचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे व्हेनेझुएलातील लष्करी सत्तांतर आणि इराणवरील कारवाई नंतर ट्रम्प आणखी एका देशावर कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

सोमवारी (ता.१६) व्हाईट हाऊसमधून बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबावर ताब्यात घेण्याचं वक्तव्य केलं. ते म्हणाले, "मला खात्री आहे की कोणत्याही परिस्थितीत क्युबा ताब्यात घेणे हा मोठा सन्मान असेल आणि तो सन्मान मला मिळेल. मी क्युबाला मुक्त करू शकतो किंवा ताब्यात घेऊ शकतो. मी क्युबासोबत मी मला हवं ते करू शकतो. कारण सध्या ते खूप कमजोर राष्ट्र आहे."

US President Donald Trump speaks at the White House amid the Iran war crisis, as global oil shortages and Cuba tensions intensify.
Pakistan Taliban conflict : जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असतानाच पाकिस्तानच्या एअर स्ट्राईकने काबूल-कंदाहार हादरले

अमेरिकेने तेल निर्बंध दालल्यामुळे मागील गेल्या काही महिन्यांपासून क्युबाला तेलाचा मोठा पुरवठा मिळालेला नाही. कारण ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाकडून क्युबाला होणारा पूर्वीचा तेलपुरवठा थांबवला आहे. त्यामुळे आता देशाला इंधन मिळवणे शक्य होत नसल्याने क्युबामध्ये वीजपुरवठा होत नसल्याने संपूर्ण बेट अंधारात बुडाले आहे. अशातच ट्रम्प यांनी आता हे राष्ट्र कमजोर झाल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, क्युबाचे अध्यक्ष मिगेल डियाझ-कॅनेल यांनी देखील देशात ऊर्जा संकट तीव्र झाल्याचं मान्य केलं आहे. शिवाय अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे देशाला गेल्या तीन महिन्यांपासून आवश्यक इंधनाचा पुरवठा मिळाला नसल्याचंही मिगेल यांनी म्हटलं आहे. शिवाय क्युबाला अमेरिकेवर आर्थिकदृष्ट्या अधिक अवलंबून ठेवण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

US President Donald Trump speaks at the White House amid the Iran war crisis, as global oil shortages and Cuba tensions intensify.
West Bengal Election 2026 : ममता दीदींना टफ फाईट : भाजपच्या पहिल्या यादीत 23 शिक्षक, 5 डॉक्टर, 6 वकिलांना उमेदवारी

अमेरिकेने क्युबाचा मित्रदेश असलेल्या व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना पदावरून हटवल्यापासून क्युबाला ताब्यात घेण्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे ट्रम्प यांनी इराणविरुद्धचे युद्ध संपल्यानंतर क्युबासोबत एखादा करार होऊ शकतो, असे संकेत देखील दिले आहेत. त्यामुळे आता क्युबा ट्रम्प यांचं ऐकणार की इराणप्रमाणे ट्रम्पविरोधी भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com