US Iran War : इंधन संकटानंतर आता जगाला बसणार मोठा हादरा? होर्मुझ समुद्रात इराण धमाका करण्याच्या तयारीत?

Strait of Hormuz subsea cables threat : अमेरिका-इराण संघर्ष वाढल्यास होर्मुझ सामुद्रधुनीखालील महत्त्वाच्या इंटरनेट केबल्सना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे जागतिक इंटरनेट सेवांवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
US Iran War : इंधन संकटानंतर आता जगाला बसणार मोठा हादरा? होर्मुझ समुद्रात इराण धमाका करण्याच्या तयारीत?
Published on
Updated on

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामुळे आधीच जगभरात इंधन संकट निर्माण झाले असताना आता आणखी एका मोठ्या धोक्याची चर्चा सुरु झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यानंतर तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.

अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि LPG च्या किमती वाढल्या असून पुरवठा विस्कळीत झाला आहे. मात्र आता इराणने समुद्रातखालील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण वाढवण्याचे संकेत दिल्याने जागतिक स्तरावर इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

US Iran War : इंधन संकटानंतर आता जगाला बसणार मोठा हादरा? होर्मुझ समुद्रात इराण धमाका करण्याच्या तयारीत?
Ambadas Danve News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेने रोखला समृद्धी महामार्ग!

इराणशी संबंधित काही माध्यमांनी असा दावा केला आहे की, होर्मुझ परिसरातून जाणाऱ्या समुद्राखालील फायबर-ऑप्टिक केबल्सवर नियंत्रण ठेवण्याची तयारी सुरू आहे. या केबल्सद्वारे जगातील बहुतांश इंटरनेट डेटा एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचतो.

अनेकांना इंटरनेट हे उपग्रहांद्वारे चालते असे वाटते, पण प्रत्यक्षात जगातील 95% पेक्षा जास्त डेटा ट्रान्सफर समुद्राखालील केबल्समधूनच होते. या केबल्समुळेच Google, Meta, Amazon आणि Microsoft सारख्या कंपन्यांचे क्लाउड नेटवर्क, सोशल मीडिया सेवा आणि डेटा सेंटर कार्यरत राहतात.

इराणचा दावा आहे की या केबल्स त्यांच्या सागरी हद्दीजवळून जात असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्याचा किंवा काही नियम लागू करण्याचा त्यांना अधिकार आहे. जर या मार्गावरील इंटरनेट ट्रॅफिकमध्ये अडथळे निर्माण झाले, तर त्याचा परिणाम केवळ सोशल मीडिया किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंगवरच नाही तर बँकिंग, शेअर बाजार, विमान सेवा आणि ऑनलाइन पेमेंट सिस्टिमवरही होऊ शकतो.

इंटरनेट बंद झालं तर भारतालाही याचा मोठा फटका!

भारतासाठीही ही परिस्थिती गंभीर मानली जात आहे. भारतातून युरोप आणि अमेरिकेकडे जाणारा मोठा इंटरनेट डेटा गल्फ आणि रेड सी परिसरातील केबल्सवर अवलंबून आहे. त्यामुळे या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास भारतातील कोट्यवधी इंटरनेट वापरकर्त्यांना संथ इंटरनेट, क्लाउड सेवांमध्ये अडचणी आणि डिजिटल व्यवहारांमध्ये विलंब जाणवू शकतो.

US Iran War : इंधन संकटानंतर आता जगाला बसणार मोठा हादरा? होर्मुझ समुद्रात इराण धमाका करण्याच्या तयारीत?
Petrol price today : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल? मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील आजचे नवे दर पाहा एका क्लिकवर!

तज्ज्ञांच्या मते, असे सांगण्यात येत आहे की, इराण थेट इंटरनेट केबल्स तोडणार नाही कारण असे केल्यास, त्यातून आंतरराष्ट्रीय संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो. मात्र केबल्सच्या दुरुस्तीला विलंब लावणे, परवानग्या रोखणे किंवा सुरक्षेचे कारण देत दबाव निर्माण करणे अशा मार्गांनी इराण जागतिक टेक कंपन्यांवर मोठा दबाव टाकू शकतो. त्यामुळे जगभरातील डिजिटल नेटवर्क आणि टेक उद्योगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com