Petrol price today : पेट्रोल-डिझेलच्या किमतीत बदल? मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील आजचे नवे दर पाहा एका क्लिकवर!

Petrol Diesel Rate City-Wise: मुंबई, पुणे आणि इतर शहरांतील आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाणून घ्या. इंधन दरातील बदल, शहरनिहाय किंमती आणि ताजे अपडेट एका क्लिकवर पाहा.
Petrol and diesel prices increased
Petrol and diesel prices increased Sarkarnama
Published on
Updated on

इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीमुळे कच्च्या तेलाच्या किंमती खूप वाढल्या आहेत. आणि त्याचा परिणाम थेट इंधन दर वाढीवर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्येही वाढ होत आहे. त्यात केंद्र सरकारने 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रूपयांनी वाढ केली आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत पुन्हा 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.

मध्यपूर्वेतील वाढता संघर्ष आणि जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही अहवालांनुसार, कच्च्या तेलाचा दर 100 डॉलरच्या पुढे जाऊ शकतो. असे झाल्यास भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा थेट परिणाम वाहतूक, मालवाहतूक आणि दैनंदिन वस्तूंच्या किमतींवर होऊ शकतो.

दरम्यान, आज देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा बदल झालेला नाही. तरीही नागरिकांचे लक्ष दरवाढीच्या शक्यतेकडे लागले आहे.

देशातील प्रमुख महानगरांतील आजचे इंधन दर पुढीलप्रमाणे आहेत.

दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 97.77 रुपये प्रति लिटर असून डिझेल 90.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 106.68 रुपये प्रति लिटर तर डिझेल 93.14 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 108.70 रुपये प्रति लिटर असून डिझेल 95.13 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 103.67 रुपये प्रति लिटर तर डिझेल 95.25 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

Petrol and diesel prices increased
Legislative Council Session : 'हे' आमदार सलग तीन अधिवेशन गैरहजर, उद्धव ठाकरेंची उपस्थितीत फक्त 31 टक्के

महाराष्ट्रातील विविध शहरांमध्येही इंधनाचे दर उच्च पातळीवर कायम आहेत.

पुण्यात पेट्रोल 107.91 रुपये प्रति लिटर असून डिझेल 94.39 रुपये प्रति लिटर आहे.

ठाण्यात पेट्रोलचा दर 107.08 रुपये प्रति लिटर तर डिझेल 93.53 रुपये प्रति लिटर आहे.

सोलापूरमध्ये पेट्रोल 107.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 93.81 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

साताऱ्यात पेट्रोलचा दर 107.71 रुपये प्रति लिटर असून डिझेल 94.20 रुपये प्रति लिटर आहे.

Petrol and diesel prices increased
Gokul Politics: नात, जावई, पै पाहुणे सगळंच काढलं! मुश्रीफ गटाच्या आरोपानंतर महाडिक गट आक्रमक; 'बात निकलेगी तो दूर तलक जाएगी'

नाशिकमध्ये पेट्रोल 107.90 रुपये प्रति लिटर तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर आहे.

तर नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 107.29 रुपये प्रति लिटर असून डिझेल 93.83 रुपये प्रति लिटर आहे.

इंधन दरवाढीमुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. आगामी काळात जागतिक परिस्थितीनुसार पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com