Philippines Emergency : अमेरिका-इराण युद्धामुळे देशात आणीबाणी, फिलीपीन्स सरकारचा मोठा निर्णय

USA-Iran War Philippines Emergency : अमेरिका इराण युद्धाने जगभर ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या संकटामुळे फिलीपीन्सने ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे.
Philippines announces emergency measures as global tensions rise due to escalating US-Iran conflict.
Philippines announces emergency measures as global tensions rise due to escalating US-Iran conflict. sarkarnama
Published on
Updated on

Philippines News : अमेरिका आणि इराण युद्धाच्या झळा आता जगभर बसू लागल्या आहेत. त्याचा पहिला फटका फिलीपीन्स देशाला बसला असून देशासमोर मोठे ऊर्जा संकट उभे राहिले आहे. फिलीपीन्सचे राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस यांनी मंगळवारी देशात ऊर्जा आणीबाणीची घोषणा केली.

युद्धामुळे फिलीपीन्सवर वीज पुरवठा खंडित होण्याचा धोका आहे. तसेच विजेचे विजेचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ नयेत आणि संभाव्य अंधाराचे संकट टाळण्यासाठी आणीबाणी जाहीर करण्यात आलीय आहे.

युद्धामुळे आणीबाणी घोषित करणार फिलीपीन्स हा पहिलाच देश ठरला आहे. पेट्रोलजन्स जे पदार्थ आहेत त्याचा पुरवठा युद्धामुळे सुरळीत होत नाही. पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठल आहे.

या पुरवठ्याची साखळी कोलमडली आहे. त्यातच फक्त 45 दिवसांचा पेट्रोलियमचा साठा फिलीपीन्स जवळ आहे. मात्र, 45 दिवसानंतर मोठे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधीच खबरदारी घेत फिलीपीन्सच्या राष्ट्रध्यक्षांनी ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे.

Philippines announces emergency measures as global tensions rise due to escalating US-Iran conflict.
Fuel Crisis: अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा मोठा फटका, भारताकडे 25 दिवस पुरेल इतकाच इंधनसाठा, पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?

जगावर संकटाचे काळे ढग

काही देशांकडे ऊर्जा साठे मर्यादित आहेत. इराण आणि अमेरिका युद्धामुळे जगभरावर ऊर्जा संकट कायम राहण्याचा धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये आपण लढलो आता देखील तशीच परिस्थिती आहे, असे सांगत हे संकट मोठे असल्याचे संकेत दिले आहेत.

Philippines announces emergency measures as global tensions rise due to escalating US-Iran conflict.
PM Modi on LPG: भारत किती LPG आयात करतो? सध्या देशात पेट्रोल-डिझेलचा किती राखीव साठा? मोदींनी लोकसभेत स्पष्टच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com