Elon Musk : इलॉन मस्क राष्ट्राध्यक्ष? काय घडतंय अमेरिकेत? डोनाल्ड ट्रम्प यांनी थेटच सांगितलं...

US President Donald Trump US Rules : डेमोक्रेटिक पक्षाकडून ‘राष्ट्राध्यक्ष मस्क’ असे म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांना डिवचले जात आहे.
Elon Musk, Donald Trump
Elon Musk, Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

New Delhi: अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प पुढील महिन्यांत पदभार स्वीकारतील. पण त्याआधीच उद्योगपती डोनाल्ड मस्क यांचे नावाने सोशल मीडियात धुमाकुळ घातला आहे. ट्रम्प यांनी मस्क यांना सरकारमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियात #PresidentMusk चलती आहे. मस्क हेच खरे राष्ट्राध्यक्ष असल्याचे खिल्ली ट्रम्प यांच्या विरोधकांकडून उडवली जात आहे.

ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. विजयानंतर ट्रम्प यांनी अनेक विभांगात नियुक्त्या केल्या आहेत. त्यानंतर डेमोक्रेटिक पक्षांसह विरोधकांकडून ट्रम्प यांच्यावर टीका केली जात आहे. ट्रम्प प्रशासनात मस्क यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाणार असल्याने मस्क हेच खरे राष्ट्राध्यक्ष असतील, अशी टीका त्यांच्याकडून केली जात आहे.

Elon Musk, Donald Trump
Samajwadi Party : समाजवादी पक्षाची आणखी एका राज्यात एन्ट्री; इंडिया आघाडीची डोकेदुखी वाढणार?

कधीच राष्ट्राध्यक्ष होणार नाहीत!

मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांनी ट्रम्प यांना निवडणुकीसाठी मोठी आर्थिक मदतही केली होती. मात्र, ते भविष्यात कधीही राष्ट्राध्यक्ष होणार नाहीत. याचे कारण खुद्द ट्रम्प यांनीच सांगितले आहे. रविवारी एका कार्यक्रमात त्यांना मस्क भावी राष्ट्राध्यक्ष असतील का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

ट्रम्प यांनी थेट नाही असे सांगितले. त्यावर बोलताना ते म्हणाले, मस्क कधीही राष्ट्राध्यक्ष बनू शकणार नाहीत. कारण त्यांचा जन्म अमेरिकेत झालेला नाही. ते दक्षिण आफ्रिकेत जन्मले आहेत. संविधानानुसार अमेरिकेत जन्मलेल्या व्यक्तीच राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

Elon Musk, Donald Trump
Nitin Gadkari : अमित शहांनंतर आता नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी; काँग्रेसचे नेते का झाले आक्रमक?

मस्क यांनी निवडणुकीत ट्रम्प यांचा प्रचार केला होता. प्रचारासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला होता. त्यामुळे विजय मिळताच ट्रम्प यांनी मस्क यांना विजयाचे शिल्पकार म्हटले होते. तसेच त्यांच्यावर सरकारमध्ये महत्वाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांकडे टीकेचे आयती संधी चालून आली आहे. परिणामी, अमेरिकेत सध्य ट्रम्प यांच्यासोबत मस्क यांचीही चर्चा अधिक होत आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com