Ajit Pawar On Sharad Pawar : 'आम्ही घेतला निर्णय...शरद पवारांना आजही दैवत मानतो' , अजितदादांनी मनातलं सगळं सांगून टाकलं

Why Ajit Pawar left Sharad Pawar to support Narendra Modi : गेली 25-30 वर्षी मी काम करतोय कोणीा सांगावं स्वार्थासाठी काही केलं. आम्ही स्वार्थ पाहणारी माणसं नाही, असे अजित पवार म्हणाले.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar News : विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली आहे. त्यांचा नागरी सत्कार पिंपरीमध्ये आयोजित केला होता. या उपमुख्यमंत्री सोहळ्यामध्ये अजित पवारांनी शरद पवारांची साथ का सोडली याविषयी भाष्य केले.

ते म्हणाले, 'आम्ही घेतलाच ना निर्णय . आम्ही पण घरामध्ये पवारसाहेबांना दैवत मानत होतो आजही मानतो. परंतु आज कुठंतरी देशाला मोदीसाहेबांसारखा मजबुत नेता मिळाला आहे. आज त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि देशाची प्रगती करणं, जगामध्ये देशाचा मानसन्मान वाढवण्या करता त्यांना पाठबळ देणं हे आपलं काम होतं.'

गेली 25-30 वर्षी मी काम करतोय कोणीा सांगावं अजित पवार स्वार्थासाठी काही केलं. आम्ही स्वार्थ पाहणारी माणसं नाही. लोकांसाठी कामं केली आहेत. पिंपरीत आपल्याकडे एकच मतदारसंघ होता आता तीन झाले आहेत. 2029 ला पाच झाले तर आश्चर्य वाटू देऊ नका, असे देखील अजित पवार यांनी म्हटले.

Sharad Pawar, Ajit Pawar
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका! 'ती' दोन कागपत्रे ठरली महत्त्वाची, एकाच घरात राहून दोन मुलांना जन्म...

कुंपणावर असणाऱ्यांचे कान टोचले

अजित पवार की शरद पवार कोणाला साथ द्यायची हे ज्यांचे अजून ठरत नाही त्यांचे कान अजित पवारांनी आपल्या भाषणात टोचले. ते म्हणाले, तळ्यात मळ्यात करू नका. एकाच मतावर ठाम राहा. तळ्यात मळ्यात करत राहिला तर तुम्हाला कोणी विचारत घेत नाही आणि पदही देत नाही, असा टोला अजित पवारांनी लगावला. तसेच एकाच मतावर ठाम राहिला तर अण्णा बनसोडे यांच्यासारखे पद मिळेल, असे देखील म्हटले.

अण्णा लवकर कामाला लागा...

अण्णा बनसोडे यांना सल्ला देताना अजित पवार म्हणाले, जेवढे महत्त्वाचे पद तेवढे कष्ट जास्त. अण्णा मूर्ती लहान पण किर्ती महान. पण अण्णा जुन्या सवयी सोडा अन् सकाळी लवकर कामाला लागा. लोकांना वेळे द्या.

राष्ट्रवादीची ताकद वाढणार

आगामी महापालिकेच्या दृष्टिने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेलेले कार्यकर्ते पदाधिकारी पुन्हा अजित पवारांसोबत उत्सुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar
Nagpur police stations : 'क्राईम सिटी'चा डाग पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात सहा नवीन पोलिस ठाणे!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com