Sanjay Nirupam: हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून काँग्रेस काय साध्य करू इच्छिते? शिवसेना नेत्याचा हल्लाबोल

काँग्रेसने धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वावर निर्लज्जपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, जिथे आतापर्यंत १३ कोटी लोकांनी पवित्र स्नान केले आहे. हे धाडस कोणत्याही कार्यकर्त्याने केले नाही तर स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे.

Sanjay Nirupam live
Sarkarnama Sanjay Nirupam live
Published on
Updated on

Congress Politics : गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात स्नान केली. शाह यांनी प्रयागराजला डुबकी मारल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या जोरदार निशाणा साधला.

शाह यांच्यावर टीका करताना खर्गे म्हणाले, शंभर जन्म घेतले तरी स्वर्गात स्थान मिळणार नाही, गंगेत डुबकी मारून गरिबी हटेल का, असा सवालही केला. त्याला शिवसेनेचे नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनीही काँग्रेसचा समाचार घेतला आहे.


Sanjay Nirupam live
Delhi Election 2025: 'सत्ता विरोधी लाट' हेच काँग्रेसचं हत्यार; काँग्रेसचा सत्तेचा वनवास कधी संपणार?

काँग्रेस त्यांच्या अध्यक्षांच्या निर्लज्जपणाशी सहमत आहे का? महाकुंभाला जनतेचा विरोध हे काँग्रेसचे अधिकृत धोरण आहे का? महाकुंभाशी संबंधित कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून काँग्रेस काय साध्य करू इच्छिते? जगभरातून हिंदू आणि बिगर हिंदू स्नान करण्यासाठी येणाऱ्या महाकुंभाला काँग्रेस निरर्थक कार्यक्रम मानते का? असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला.


Sanjay Nirupam live
Sanjay Raut : संजय राऊतांसमोरच रंगले मानपान नाट्य !...म्हणून माजी आमदार मोकाटे रागाने बैठकीतून पडले बाहेर

काँग्रेसने प्रयागराजमधील महाकुंभाच्या धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वावर निर्लज्जपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, जिथे आतापर्यंत १३ कोटी लोकांनी पवित्र स्नान केले आहे. हे धाडस कोणत्याही कार्यकर्त्याने केले नाही तर स्वतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की कुंभमेळ्यात स्नान केल्याने गरिबी दूर होईल का? असे निरुपम यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले आहे.


Sanjay Nirupam live
Raj Thackeray On One Nation One Election: मोदी सरकारचा पुन्हा एकदा धाडसी निर्णय? राज ठाकरे 'वन नेशन, वन इलेक्शन'वर म्हणतात...

मध्य प्रदेशातील महू येथील एका कार्यक्रमात मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप नेत्यांच्या महाकुंभ स्नानाबाबत वादग्रस्त विधान केले. खर्गे यांच्या या विधानावर आता नवा वाद निर्माण झाला आहे. 'मोदीजी तर खूप गप्पा मारतात. हातात संविधान घेऊन नमस्कार करतात. पण सगळे काम संविधानाविरोधात करत आहेत. शिक्षणात घोटाळा, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, असे निरुपम म्हणाले.

काय म्हणाले होते खर्गे...

मोदी-शाह यांनी एकत्रितपणे खूप पापं केली आहेत. त्यामुळे पुढील 100 जन्म घेतले ते स्वर्गात जाणार नाही. लोकांकडून मिळणाऱ्या शापामुळे नरकात जागा जातील, असा जोरदार हल्ला खर्गेंनी चढवला. खर्गे यांच्या या विधानानंतर भाजप नेत्यांनी पलटवार केला. खासदार संबित पात्रा म्हणाले, सनातन आस्थेचे प्रतिक असलेल्या महाकुंभची काँग्रेस आणि पक्षाचे अध्यक्ष खिल्ली उडवत आहेत. त्यांचे हे विधान अत्यंत लाजिरवाणे आहे, अशी टीका करताना पात्रा यांनी त्यांना हिंदू विरोधी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com