Parliament Winter Session: मोठी अपडेट! संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली, मोदी सरकार 'हे' तीन विधेयक मंजूर करणार ?

Modi Government Vs INDIA Alliance : लोकसभेचं संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते 20 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती केंद्रीय सांसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विट करुन दिली आहे.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आलं आहे. तर विरोधी बाकावर काँग्रेसप्रणित 'इंडिया' आघाडी आहे. बहुमतापासून काही दूर राहिलेल्या भाजपसमोर आता दोनशे पार गेलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीचा आवाज वाढला आहे. केंद्रातील सत्तांतरानंतर पहिल्याच अधिवेशनात याची झलक पाहायला मिळाली होती. अशातच आता संसदेतून एक मोठी अपडेट समोर आली आहे.

लोकसभेचं संसदेचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) येत्या 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते 20 डिसेंबरपर्यंत ते सुरू राहणार आहे, अशी माहिती केंद्रीय सांसदीय कार्यमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विट करुन दिली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यान,मोदी सरकार'वन नेशन, वन इलेक्शन' प्रस्ताव,, वक्फ (दुरुस्ती) विधेयक,समान नागरी कायदा 2024 यांसारख्या विषयांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशनादरम्यान,मोदी सरकार'वन नेशन, वन इलेक्शन' प्रस्ताव,, वक्फ (दुरुस्ती) विधेयक,समान नागरी कायदा 2024 यांसारख्या विषयांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या दौऱ्यावर असताना एकता दिवसही साजरा केला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आता आपण एक देश एक निवडणुकीवर काम करत आहोत. त्यामुळे देशाची लोकशाही मजबूत होईल. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी गती मिळेल.

एक राष्ट्र एक नागरी संहिता म्हणजेच धर्मनिरपेक्ष नागरीक संहितेच्या दिशेने आपण जात आहोत. यासाठी सामाजिक एकदा ही आमची प्रेरणा आहे. आमच्या प्रत्येक योजनेत, प्रत्येक धोरणात आणि आमच्या भावनेत एकतेची शक्ती आहे, असे संकेतही पंतप्रधान मोदी यांनी दिले होते.

Rahul Gandhi, Narendra Modi
Madha Constituency : शिंदेंचा माढ्यात मोहिते पाटलांना धक्का; कट्टर समर्थकाचा रणजित शिंदेंना पाठिंबा

मोदी सरकारने आपल्या 2014 आणि 2019 च्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात अनेक धडाकेबाज निर्णय घेतले होते. मात्र,नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपचा चारशे पारचा दिलेला नारा फोल ठरला आणि बहुमताचं स्वप्नं भंगलं. शेवटी एनडीएतील मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता स्थापन केली आणि देशाच्या पंतप्रधानपदी तिसर्यांदा नरेंद्र मोदी विराजमान झाले.त्यांनी यापुढील काळात अनेक मोठे निर्णय घेणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. सिलसिला आगामी पाच वर्षांच्या काळात वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयक हे दोन मुद्दे अतिशय गाजण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधाक या दोन मुद्यांवर सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखत आहेत.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयक हे दोन मुद्दे अतिशय गाजण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांची इंडिया आघाडी या दोन मुद्द्यांवरुन मोदी सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखत आहेत.

Rahul Gandhi, Narendra Modi
Aurangabad East Assembly: उद्धवसेनेच्या राजू वैद्य यांच्या माघारीने अतुल सावे रिलॅक्स! खैरेंचे मानले आभार

हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाण्याआधी मोदी सरकार आधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वन नेशन-वन इलेक्शनच्या प्रस्तावाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे.

विरोधी पक्षाकडून या विधेयकाला आधीपासून विरोध केला जात आहे. तसेच विरोधक देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या निर्णयाच्या देखील विरोधात आहेत. अशा स्थितीत हे विधेयक मंजूर करणं सरकारसाठी कठीण होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com