New Delhi : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदानाला सुरूवात झाली असून पहिला निकालही हाती आला आहे. हा निकाल रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना सुखावणार असून डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचे टेन्शन वाढवणारा आहे.
न्यू हॅम्पशायरमधील डिक्सविल नॉच या गावातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतमोजणीमध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजेच प्रत्येकी तीन मते मिळाली आहे. डिक्सविल नॉचच्या इतिहासात ट्रम्प यांना यावेळी मिळालेली मते सर्वाधिक आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.
डिक्सविल नॉच हे छोटे गाव असून सहा मतदारांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अमेरिकेत मतदान सर्वात आधी मतदान पूर्ण होण्याची या गावाची परंपरा आहे. ती यावर्षी कायम राहिली. केवळ सहा मते असली तरी एक संकेत म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे आज झालेल्या मतमोजणीतून दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
2016 मध्ये ट्रम्प यांना या गावांत दोन मते मिळाली होती. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांना चार मतदारांनी पसंती दिली होती. 2020 च्या निवडणुकीत ज्यो बायडेन यांना पाच मते मिळाली होती. यावेळी मात्र ट्रम्प यांनी तीन मते घेत निवडणुकीतील चुरस दाखवून दिली आहे.
दरम्यान, अमेरिकेतील आठ राज्यांमध्ये दुपारी साडेचार वाजता मतदानाला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये कनेक्टिकट, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, न्यू हॅम्पशायर, केन, इंडियाना, केंटुकी आणि वर्जिनिया या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये कुणाला आघाडी मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
थायलंडमधील खाओ खेओ खुल्या प्राणीसंग्रहालयात मू डेंग हा प्रसिध्द पाणघोडा आहे. प्राणीसंग्रहालयात मू डेंगसाठी दोन टरबूज ठेवण्यात आले. एका टरबुजावर डोनाल्ड ट्रम्प आणि एकावर कमला हॅरिस यांचे नाव लिहिण्यात आले होते. त्यानंतर हे टरबूज खाण्यासाठी मू डेंग पाण्यातून बाहेर आला. त्याने दोनपैकी एका टरबुजाकडे धाव घेतली. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव लिहिले होते. याआधारे मू डेंगने डोनाल्ड ट्रम्प विजयी होतील, अशी भविष्यवाणी केल्याचे मानले जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.