भाजपनं कधीही न जिंकलेल्या जागांसाठी पाशा पटेल मैदानात

पक्षश्रेष्ठींनी सोपविलेल्या जबाबदारीनंतर दोन दिवसापूर्वी पाशा पटेल मतदार संघात दाखल झाले आहेत. तेथे पोहोचताच त्यांनी झंजावती प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे.
Pasha Patel
Pasha Patelsarkarnama

-राम काळगे

निलंगा : उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपाच्या योगी सरकारने (Yogi Adityanath)गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांसह सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपा पूर्ण शक्तीनिशी निवडणूक मैदानात उतरला आहे.

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी कधीच न जिंकलेल्या दोन मतदार संघात प्रचाराची जबाबदारी भाजप (bjp)पक्षश्रेष्ठीने ज्येष्ठ नेते पाशा पटेल (Pasha Patel)यांच्यावर सोपविली आहे. त्यासाठी पाशा पटेल हे उत्तर प्रदेशात दाखल झाले आहेत.

या निवडणुकीसाठी भाजपा आतापर्यंत कधीच न जिंकलेल्या प्रतापगड जिल्ह्यातील रामपुर खास आणि बाबा गंज या दोन विधानसभा मतदार संघाची प्रचाराची धुरा पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठ नेते तथा स्टार प्रचारक पाशा पटेल यांच्यावर सोपविली आहे. त्यांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे.

Pasha Patel
Hijab Row:हिजाब वादानंतर शाळाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला महत्वाचा निर्णय

पक्षश्रेष्ठींनी सोपविलेल्या जबाबदारीनंतर दोन दिवसापूर्वी पाशा पटेल या दोन मतदार संघात दाखल झाले आहेत. तेथे पोहोचताच त्यांनी झंजावती प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे. पक्षश्रेष्ठींनी सोपविलेली जबाबबदारी प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून सार्थ ठरविण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. दोन्ही मतदारसंघ पिंजून काढत आतापर्यंत भाजपाला यश न मिळालेल्या या दोन जागा जिंकण्यासाठी जीवाचे रान करू, अशी ग्वाही पाशा पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. भाजपाच्या योगी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांसह सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजपा पूर्ण शक्तीनिशी निवडणूक मैदानात उतरला आहे. या निवडणुकीसाठी भाजपा आतापर्यंत कधीच न जिंकलेल्या प्रतापगड जिल्ह्यातील रामपुर खास आणि बाबा गंज या दोन विधानसभा मतदार संघाची प्रचाराची धुरा पक्षश्रेष्ठींनी ज्येष्ठ नेते तथा स्टार प्रचारक पाशा पटेल यांच्यावर सोपविली आहे. त्यांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे.

Pasha Patel
कॉग्रेसच्या खासदार पतीसाठी भाजपच्या प्रचारात ; 'कॅप्टन'साठी मते मागणार

पाशा पटेल हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहेत. ते चळवळीतील नेतृत्व असून अनुभवी, अभ्यासू, आपल्या वक्तृत्वशैलीद्वारे जनतेला आकर्षित करणारे नेते आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून ते भाजपाचे काम एकनिष्ठेने करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रदूषण मुक्त भारत बनविण्याच्या प्रयत्नाला बळ देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणपूरक बांबू लागवड, बॉयलरमध्ये दगडी कोळसाऐवजी बांबू वापरासाठी ते देशभर अभियान राबवित आहेत. त्यास प्रभावित होऊन अनेक ठिकाणी बांबू लागवड आणि वापर सुरू झालेला आहे.

Pasha Patel
हिजाब परिधान करणारी मुलगी पंतप्रधान होईल!

गर्दी जमण्याची किमया

शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी केलेले आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विनंतीनुसार ते भाजपात दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांनी एकनिष्ठेने काम करताना आजवर पार पडलेल्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडलेली आहे.

त्यांच्यातील संघटन कौशल्य, उत्कृष्ट वक्तृत्व शैली आणि गर्दी जमण्याची किमया पाहता आतापर्यंत भाजपाला जिंकता न आलेल्या रामपुर खास आणि बाबा गंज या दोन विधानसभा मतदार संघात प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ते ठीकठिकाणी जाहीर सभा घेऊन भाजपाची विचारसरणी, राज्य सरकारने केलेली विकास कामे, ध्येय-धोरणे आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत जनतेसमोर मांडणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com