घरात दोनशे कोटींची कॅश ठेवून जैन फिरायचे जुन्या स्कूटरवर!

पीयूष जैन (Piyush Jain) यांच्यावर छापा टाकून तब्बल दोनशे कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
Piyush Jain

Piyush Jain

Sarkarnama

Published on
Updated on

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुगंधी द्रव्ये आणि अत्तराचे व्यापारी पीयूष जैन (Piyush Jain) यांच्यावर छापा टाकून वस्तू व सेवा कर गुप्तचर संचालनालयाने (DGGI) तब्बल दोनशे कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. जैन यांना आता अटक करण्यात आली असून, त्यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर येत आहे.

जैन यांचे मूळ शहर कनौज आहे. कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक असलेले जैन हे कनौजमध्ये आल्यानंतर त्यांच्या जुन्या स्कूटरवर शहरात हिंडायचे. कनौजमधील त्यांच्या घरासमोर क्वालिस आणि मारुती असा दोन कार उभ्या आहेत. परंतु, ते कायम स्कूटरवर फिरायचे. पीयूष जैन यांचे पिता हे केमिस्ट होते. त्यांच्याकडूनच त्यांनी अत्तर बनवण्याची प्रक्रिया शिकून घेतली.

कानपूरमध्ये त्यांनी सुरू केलेला अत्तर व्यवसाय आता देशातील 15 राज्यांमध्ये पसरला आहे. जैन यांचा व्यवसाय विस्तार मुंबई आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अत्तराचा व्यवसाय विस्तारल्यानंतर जैन आणि त्यांचे बंधू अंबरीश यांनी कनौजमदील 700 चौरस यार्डच्या जुन्या घराचे हवेलीत रुपांतर केले. असे असले तरी जैन हे नेहमी साधेपणाने राहत. ते कनौजमध्ये आल्यानंतर जुन्या स्कूटरवरून फिरण्यास पंसती देत असत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

<div class="paragraphs"><p>Piyush Jain</p></div>
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

डीजीजीआयने जैन यांचे घर, कंपनी, कार्यालयांसह त्यांच्या भागीदारांच्या घरावर छापे टाकले आहेत. यात 194 कोटी रूपयांची रोकड आणि 27 किलो सोने जप्त केले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि उत्पादन शुल्क मंडळाचे (सीबीआयसी) अध्यक्ष विवेक जोहरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिमूर्ती फ्रॅगरन्स या कंपनीशी संबंधित कानपूर आणि अन्य ठिकाणी देखील छापे घालण्यात आले. जैन यांच्या घरात सापडलेली रोकड मोजण्यासाठी तब्बल आठ मशिन वापरण्यात आल्या.

<div class="paragraphs"><p>Piyush Jain</p></div>
तेजस्वी सूर्या पडले तोंडावर; विनाशर्त घ्यावी लागली माघार

काही दिवसांपूर्वी पीयूष जैन यांच्या कंपनीने समाजवादी अत्तर बाजारात आणले होते. या कारवाईनंतर पीयूष जैन यांच्या उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित अनेक बाबी समोर आल्या आहेत. त्यांच्या कंपनीची कानपूर, कनौज आणि मुंबईतही कार्यालये असल्याचे स्पष्ट झाले आहे. जैन यांच्या मालकीच्या चाळीसहून अधिक कंपन्या असून त्यांच्या माध्यमातून ते अत्तराचा व्यवसाय करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com