Vijay CM Oath Ceremony : तमिळनाडूत इतिहास घडला! थलपती विजयने घेतली मुख्यमंत्रि‍पदाची शपथ!

Tamil Nadu Politics Vijay : तमिळनाडूनधील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला असून आज टीव्हीके प्रमुख जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
Vijay CM Oath Ceremony
Vijay CM Oath Ceremonysarkarnama
Published on
Updated on

CM Vijay Oath Ceremony : तमिळनाडूमधील सत्तेचे समीकरण अखेर सुटले. आज चेन्नईमधील जवाहरलाल नेहरु स्टेडीयमवर हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली.

मागील सहा दशकांपासून तमिळनाडूमध्ये डीएमके आणि एडिएमके यांच्या आलटूनपालटून सत्ता होती. मात्र, पहिल्यांदाच तमिळनाडूमध्ये इतिहास घडला. हे दोन्ही पक्ष सत्तेच्या बाहेर असून तमिलगा वेट्री कझगम (टीव्हेके) पक्ष सत्तेत आला आहे. विजय यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत 9 जणांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून विजय यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांना टीव्हीके प्रमुख विजय यांचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी अभिनंदन केले.

राज्यपाल मुख्यमंत्रि‍पदाची शपथ देत असताना शपथेसाठी दिलेल्या मजकुराशिवाय इतर गोष्टी विजय बोलत होते. त्यावेळी राज्यपाल राजेंद्रअर्लेकर यांनी त्यांना रोखले आणि जे दिले आहे ते वाचून शपथ घ्या, असे सांगितले.

Vijay CM Oath Ceremony
Vijay CM Oath Ceremony : तमिळनाडूत विजय यांचा शपथविधी; 'या' नेत्यांनाही मंत्रिपदाची संधी, यादी आली समोर...

विजय यांच्या मुख्यमंत्र्याच्या शपथेनंतर सेल्वी एस. कीर्तना यांनी राज्याच्या मंत्रीपदाची तर, वेंकटरामनन, आर. निर्मलकुमार, राजमोहन आणि डॉ. टी. के. प्रभू यांनी तामिळनाडू राज्याचे मंत्री म्हणून शपथ घेतली. एकुण नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

राहुल गांधी उपस्थित

विज यांच्या शपथविधी समारंभासाठी राहुल गांधी उपस्थित होते. काँग्रेसचे पाच आमदार विजयी झाले आहेत. काँग्रेस आणि डीएमकेची युती होती. मात्र, या युतीमधून बाहेर पडत त्यांनी विजय यांच्या टीव्हीकेला पाठींबा दिला. त्यामुळे डीएमकेने काँग्रेसवर टीका करत संधीसाधू असे म्हटले.

Vijay CM Oath Ceremony
Joseph Vijay: अखेर ठरलं! जोसेफ विजय यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तिसऱ्या भेटीनंतर राज्यपालांचा हिरवा कंदील

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com