'जीव देण्याशिवाय पर्याय नाही!', म्हणत माजी CMच्या पुतण्याचा थेट पोलिसांवरच आरोप? व्हिडिओ व्हायरल होताच वातावरण तापलं!

suicide threat video : माजी मुख्यमंत्र्याच्या पुतण्याचे जीव देण्याची धमकी दिल्याने पोलिस यंत्रणेची झोप उडाली असून एकच खळबळ उडाली आहे. तर त्या व्हिडिओत माजी मुख्यमंत्र्याच्या पुतण्याने 18 कोटींच्या फसवणूक प्रकरणात थेट पोलिसांवरच आरोप केले आहेत.
Dehradun suicide threat
Dehradun suicide threatsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. डेहराडून येथे विक्रम सिंह राणा यांचा आत्महत्येची धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  2. त्यांनी पोलिसांवर १८ कोटींच्या फसवणुकीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

  3. या प्रकरणात एसएसपींनी स्थानिक पोलिसांना तपासाचे आदेश दिले असून राजकीय वातावरण तापले आहे.

Dehradun News : उत्तराखंडमधील डेहराडून येथे पोलिसावर आरोप करत आत्महत्या करण्याची धमकी देणारा व्हिडिओ व्हायर झाल्याने सध्या एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता एसएसपींनी स्थानिक पोलिसांना पूर्ण तापास करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ होताना दिसत आहे. माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचे पुतणे विक्रम सिंह राणा यांनी 18 कोटींच्या फसवणूक प्रकरणात थेट पोलिसांवरच आरोप केल्याने उत्तराखंडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे.

माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचे पुतणे विक्रम सिंह राणा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी 18 कोटींच्या फसवणूक प्रकरणाचा उल्लेख करताना पोलिसांवर आरोप केले आहेत. तसेच तक्रार नोंदवूनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. यामुळे आता जीव देण्याशिवाय पर्याय नाही, असे म्हणत व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे पोलिसांवर शंका उपस्थित केली जातेय.

Dehradun suicide threat
Uttarakhand UCC Bill : उत्तराखंडने रचला इतिहास ; यूसीसी विधेयक लागू करणारे देशातील पहिले राज्य...

राणा यांनी या व्हिडिओत, आपण डिसेंबर 2024 मध्ये 18 कोटींच्या फसवणूक प्रकरणात एक लेखी तक्रार देहारादून पोलिसांना दिली होती. मात्र त्यावर पोलिसांनी आतापर्यंत कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे मला आता मरण्याशिवाय पर्याय नाही. पोलिसांनी माझ्या प्रकरणात अक्षम्य बेजबाबदारपणा आणि पक्षपातीपणा केलाय, असाही आरोप राणा यांनी केला आहे.

राणा यांचा व्हिडिओ व्हायरल होताच आता पोलीस प्रशासनाच्या पाया खालची वाळू सरकली आहे. प्रशासन खडबडून जागे झाले असून डेहराडूनच्या एसएसपींनी याची पूर्ण तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच याबाबत एक निवेदन ही प्रसिद्ध केले आहे. ज्यात एसएसपींनी, विक्रम सिंह राणा यांच्या तक्रारीचा तपास सीओ मसुरी यांच्याकडे देण्यात आला असून प्राथमिक तपासात प्रकरण दिवाणी असल्याचं समोर आलं आहे. त्या प्रमाणे राणा यांना न्यायालयात दाद मागा असा सल्ला देण्यात आला आहे. याबाबतचा तपास नुकताच पूर्ण झाला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुन्हा तपासाचे आदेश देण्यात आल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा चर्चेत आला आहे. तसेच पोलिसांच्या कार्यपद्धतीवर देखील सवाल उपस्थित केले जात आहे. तर आर्थिक व्यवहार बहुतांशपणे दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारित येत असले तरी फसवणूक आणि गुन्हेगारी कट हे विषय फौजदारीमध्ये येतात. त्यावर पोलिसांनी तपास का केला नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

तर विक्रम सिंह राणा यांनी धमकी दिल्यानंतर आता पोलिसांनी कडक पावले उचलली असून रितसर गुन्हा दाखल केला आहे. तसेच आर्थिक फसवणूक झाली असल्यास कायदेशीर लढाई लढावी, अशा पद्धतीने समाज माध्यमांवर जाऊन वाढवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Dehradun suicide threat
UCC Bill Uttarakhand : अखेर उत्तराखंडमध्ये 'समान नागरी कायदा' मंजूर; काय होणार बदल?

FAQs :

प्रश्न 1: व्हिडिओमध्ये आत्महत्येची धमकी कोणी दिली?
उत्तर: माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचे पुतणे विक्रम सिंह राणा यांनी.

प्रश्न 2: त्यांनी कोणावर आरोप केले आहेत?
उत्तर: त्यांनी थेट पोलिसांवर १८ कोटींच्या फसवणुकीचे आरोप केले आहेत.

प्रश्न 3: यावर प्रशासनाने काय पावले उचलली आहेत?
उत्तर: एसएसपींनी स्थानिक पोलिसांना संपूर्ण तपासाचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com