Rahul Gandhi Supreme Court petition : मोठा गाजावाजा करत याचिका दाखल, पण राहुल गांधींना काही तासांतच झटका; 14 कारणांमुळे लगेच सुनावणी नाही...

Rahul Gandhi Supreme Court petition, Election Commission of India, Gyanesh Kumar, SIR voter list revision : कोर्ट रजिस्ट्रीने घेतलेले आक्षेपांचे निरसन झाल्यानंतरही आता ही याचिका सुनावणीला येऊ शकेल. त्यामुळे एवढा गाजावाजा करून दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीसाठी विरोधकांना आता वाट पाहावी लागणार आहे.
Rahul Gandhi, Supreme Court
Rahul Gandhi, Supreme CourtSarkarnama
Published on: 
Updated on: 

Supreme Court news : केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीकडून सोमवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्याआधी विरोधी पक्षनेतै राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत मोर्चा काढला. सर्व प्रमुख नेते या मोर्चात सहभागी झाले होते. पण याचिका दाखल झाल्यानंतर काही तासांतच विरोधकांना झटका बसला आहे.

राहुल गांधी हे प्रमुख याचिकाकर्ते असून त्यांच्यासह अन्य दहा नेत्यांच्याही याचिकेत नावे आहेत. मात्र, ही याचिका दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर लगेच सुनावणी होणार नाही. याचिकेमध्ये जवळपास १४ त्रुटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही याचिका सुनावणीसाठी लिस्टेड होऊ सकली नाही.

वकिलांकडून शेवटच्या क्षणी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्ट रजिस्ट्रीने याचिका दाखल करण्याबाबतच्या प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवले आहे. याचिकेत नावे असलेल्या काही नेत्यांच्या सह्याच झालेल्या नाहीत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिलेले ओळखपत्र स्पष्ट दिसत नाही. याचिकेसाठीचे भरण्यात आलेल्या शुल्कामध्ये २२० रुपये कमी आहेत, अशा त्रुटी काढण्यात आल्या आहेत.

Rahul Gandhi, Supreme Court
Rahul Gandhi news : राहुल गांधींचा पहिल्यांदाच सर्वात मोठा दावा; ज्ञानेश कुमारांचे आपल्याला मेसेज, मोदी सरकारमधील 200 अधिकारी...

त्याचप्रमाणे रजिस्ट्रीकडून राज्यघटनेतील कलम ३२ अंतर्गत दाखल या रिट याचिकेमध्ये निवडणूक आयुक्तांना वैयक्तितपणे प्रतिवादी करण्यावरही बोट ठेवण्यात आले आहे. याबाबतचे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. बहुतेक नेत्यांची वकीलपत्रेच दाखल करण्यात आलेली नाहीत, या महत्वाच्या त्रुटी आढळून आल्याने याचिका सुनावणीला येऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Rahul Gandhi, Supreme Court
Rahul Gandhi News : विवेक भीमनवार रजेवर, राहुल गांधींनीही घेतली दखल; म्हणाले, आता भ्रष्टाचाराची चौकशी...

कोर्ट रजिस्ट्रीने घेतलेले आक्षेपांचे निरसन झाल्यानंतरही आता ही याचिका सुनावणीला येऊ शकेल. त्यामुळे एवढा गाजावाजा करून दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणीसाठी विरोधकांना आता वाट पाहावी लागणार आहे. या याचिकेमध्ये एसआयआरशी संबंधित निवडणूक आयोगाच्या निर्णयांचे संपूर्ण दस्तावेज कोर्टासमोर सादर करण्याची सर्वात मोठी मागणी करण्यात आली आहे. दोन निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्तांमध्ये कथित मतभेद असल्याचा दावा करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com