Karnataka Vote Chori : राहुल गांधींच्या आरोपांनंतर 'व्होट चोरी'चा सर्वात मोठा घोटाळा आला समोर; एका मतदाराचे नाव हटवण्यासाठी 80 रुपयांचा रेट, SIT चा खळबळजक खुलासा

Karnataka voter list fraud SIT investigation : देशभरात सध्या व्होट चोरीचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पुराव्यासहीत त्यांनी काही मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi vote Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka Voter List Scam : देशभरात सध्या व्होट चोरीचा मुद्दा चांगलाच गाजतो आहे. या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. पुराव्यासहीत त्यांनी काही मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधींनी व्होट चोरीचा मुद्दा उपस्थित करताच देशभरातली विरोध पक्ष या मुद्द्यावरून सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. नुकतंच महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्होट चोरीचा आरोप करत मतदार यांद्यांमधील घोळ मिटवल्याशिवाय स्थानिकच्या निवडणुका घेऊ नये, या मागणीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

तर निवडणूक आयोगावर हे आरोप होत असतानाच कर्नाटकातील अलंद मतदारसंघातील एका मतदाराचे नाव हटवण्यासाठी 80 रूपये घेतल्याचा खळबळजक खुलासा एसआयटीने केला आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं दिसून येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

2023 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी अलंद मतदारसंघात निवडणूक आयोगाकडे मतदारांची नावे वगळण्यासाठी बनावट अर्ज करण्यात आले. तर या अर्जासाठी डेटा सेंटर ऑपरेटरला एका अर्जासाठी 80 रुपये दिल्याची माहिती अलंद येथील मतदार यादीमधून नावे हटवल्याच्या आरोपाची चौकशी करणाऱ्या कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) दिली आहे.

डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान या मतदारसंघात अशा एकूण 6018 अर्ज करण्यात आले होते. यासाठी एकूण 4.8 लाख रुपये देण्यात आले. महत्वाचं म्हणे राहुल गांधींनी देखील अलंद येथील मतदार यादीतील घोळाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर या प्रकरणी एसआयटीने भारतीय जनता पक्षाचे नेते सुभाष गुत्तेदार यांच्याशी संबंधीत मालमत्तांवर छापेमारी केली.

गुत्तेदार हे 2023 च्या अलंद निवडणुकीत काँग्रेसच्या बी. आर. पाटील यांच्याकडून पराभूत झाले होते. एसआयटीने या प्रकरणी तपास करताना कलबुर्गी जिल्हा मुख्यालयातील एका डेटा सेंटरवर फोकस केला. त्याच सेंटरवरून सर्व अर्ज दाखल केल्याची माहिती मिळाली होती.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये नावे हटवल्याचं लक्षात येताच या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस आणि सीआयडी सायबर क्राइम यूनिटने केला होता. ज्यामध्ये मोहम्मद अशफाक नावाच्या एका स्थानिक व्यक्तीचा हात असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एसआयटीने सुरू केला.

Rahul Gandhi
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या नावाखाली ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरांवर बुलडोझर; नाशिकचे चारही मंत्री बिळात लपल्याची महंतांची टीका

आश्चर्याची बाब म्हणजे 2023 मध्ये मोहम्मद अशफाकची चौकशी करण्यात आली. मात्र, यावेळी त्याने आपल्याकडील इलेक्ट्रॉनिक उपकरणे पोलिसांना देईल असं आश्वासन दिल्यानंतर त्याला सोडलं गेलं आणि तो दुबईला स्थलांतरीत झाला. दरम्यान, आता एसआयटीने इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड आणि अशफाककडून ताब्यात घेतलेली उपकरणांचा तपास केला असता इंटरनेट कॉल्सच्या साह्याने त्याचे सहकारी मोहम्मद अक्रम, जुनैद, अस्लम आणि नदीम यांच्या तो संपर्कात असल्याचं आढळलं.

त्यानंतर एसआयटीने या सर्व सहकाऱ्यांच्या मालमत्तांवर छापे टाकल्यानंतर कलबुर्गी भागात मतदार यादीत फेरफार करण्यासाठी चालवले असलेले एक डेटा सेंटरचे ऑपरेशन आणि एक नाव वगळण्यासाठी 80 रुपये दिल्याची माहिती सिद्ध करणारी पुरावे सापडले. शिवाय हे डेटा सेंटर मोहम्मद अक्रम आणि अशफाक यांच्यामार्फत चालवले जात होते, तर इतर सहकारी डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करत होते, अशीही माहिती समोर आली.

Rahul Gandhi
Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांच्या मनात काय? शिवसेनेचा लोगो हटवला! नव्या कव्हर फोटोमुळे वेगळीच चर्चा!

त्यानंतर एसआयटीने 17 ऑक्टोबर रोजी भाजप नेते गुत्तेदार आणि त्यांच्यां दोन मुलांसह त्यांचे सीएच्या घरी शोध घेतला. यावेळी या पथकाने त्यांचे लॅपटॉप, मोबाईल फोन्स तपासणीसाठी ताब्यात घेतले असता अलंद मतदार यादीत बदल करण्याची विनंती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी 75 वेगवेगळे मोबाईल नंबर वापरल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

मात्र, डेटा सेंटर ऑपरेटर्सनी बनावट माहिती वापरून निवडणूक आयोगाच्या पोर्टलमध्ये एक्सेस कसा मिळवला गेला? याबाबतचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. मात्र, या प्रकरणामुळे आता राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना बळ मिळाल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com