Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकरांच्या मनात काय? शिवसेनेचा लोगो हटवला! नव्या कव्हर फोटोमुळे वेगळीच चर्चा!

Ravindra Dhangekar VS BJP : रवींद्र धंगेकर यांनी फेसबूक आणि ट्विटरवरील शिवसेनेचे लोगो असलेले कव्हर फोटो हटवला आहे.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar Sarkarnama
Published on
Updated on

Ravindra Dhangekar News : शिवसेनेचे महानगर प्रमुख, माजी आमदार रवींद्र धंगेकर हे महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत. भाजप नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धंगेकर यांची तक्रार केली होती. मात्र, या तक्रारीनंतर देखील धंगेकरांचा आक्रमक पवित्रा कायम होता.

दरम्यान, धंगेकरांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, धंगेकरांनी आपल्या सोशल मिडिया एक्स (पूर्वीचे) ट्विटरवरील कव्हर फोटो बदलले आहे. शिवसेनेचा लोगो असलेले कव्हर फोटो त्यांनी बदललेला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबूकचा देखील शिवसेनेचे लोगो असलेला कव्हर फोटो बदलला होता.

रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरला 'सत्यमेव जयते पुणेकर फर्स्ट' मजकूर असलेला फोटो आपल्या एक्स अकाऊंटच्या कव्हरला लावला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते भाजप नेत्यांसोबत पंगा कायम ठेवणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

शिवसेनेतून हकालपट्टी होईल, या पार्श्वभूमीवर त्यांनी पोस्ट करत त्यांनी एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अन्यायाविरोधात आवाज उठविणाऱ्या शिवसैनिकावर आजपर्यंत कारवाई केलेली नाही.अन्यायाविरोधात लढण्यासाठी त्यांचं नेहमी पाठबळ राहील, असा मला विश्वास आहे, असे म्हटले आहे. तसेच हकालपट्टीबाबत भाजपमधील नेत्याने बातम्या पेरल्याच्या आरोप केला आहे.

Ravindra Dhangekar
असा काढा कुणबी जातीचा दाखला; कुणबी प्रमाणपत्रासाठी कोणती कागदपत्र लागतात?

फेसबूक कव्हरमध्ये बदल

रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या फेसबूकच्या कव्हरला शिवसेनेचे चिन्हा असलेल्या धनुष्यबाणाचे चिन्ह आणि जय महाराष्ट्र असा मजकूर होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांनी हे कव्हर बदलून गुन्हेगारी संपवा, पुण्यनगरी वाचवा, असा मजकूर असलेला कव्हर फोटो अपडेट केला आहे. फेसबूक पाठोपाठ त्यांनी ट्विटवर देखील पुणेकर फर्स्ट असलेला कव्हर अपडेट केला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका काय असेल असे संकेत त्यांनी दिले आहेत.

Ravindra Dhangekar
Thackeray Brothers news,: दिवाळीनंतर मोठा राजकीय धमाका होणार; ठाकरे बंधूंच्या भेटींचा सिलसिला सुरुच! 3 महिन्यात 8 वेळा भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com