Voter List Name Inclusion : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, मतदार यादीतून नाव वगळलं गेलंय? कोणतीही कारवाई न होता 'असं' करा पुन्हा नाव समाविष्ट

How to add name back in voter list : मतदार यादीतून नाव वगळले गेले आहे का? निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुन्हा नाव समाविष्ट करण्यासाठी काय करावे, जाणून घ्या.
Election Commision
Election CommisionSarkarnama
Published on: 
Updated on: 

SIR प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून नाव वगळले गेलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मतदार यादीत यापूर्वी नाव असतानाही काही कारणांमुळे नाव वगळले गेले असेल, तर आता पुन्हा नाव समाविष्ट करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी फॉर्म-6 भरल्यामुळे केवळ पूर्वी मतदार म्हणून नोंदणी होती या कारणावरून संबंधित नागरिकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही महत्त्वाची भूमिका मांडली आहे. SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्या नागरिकांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी फॉर्म-6 भरता येणार आहे. यापूर्वी फॉर्म-6 हा प्रामुख्याने पहिल्यांदा मतदार म्हणून नोंदणी करणाऱ्या नागरिकांसाठी वापरला जात होता.

Election Commision
Latur DCC Bank Election Results : लातूर जिल्हा बँकेवर पुन्हा देशमुखांचीच सत्ता; निलंगेकरांच्या पॅनलचा पराभव

या अर्जामध्ये यापूर्वी कोणत्याही मतदार यादीत नाव नसल्याचे घोषित करावे लागते. चुकीची माहिती दिल्यास लोकप्रतिनिधित्व कायदा, 1950 मधील कलम 31 अंतर्गत कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे अनेक नागरिक फॉर्म-6 भरण्यास घाबरत होते.

मात्र, निवडणूक आयोगाने आता स्पष्ट केले आहे की, केवळ फॉर्म-6 भरल्यामुळे पूर्वी मतदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई होणार नाही. मात्र, संबंधित व्यक्तीचे नाव दुसऱ्या विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत आधीपासून नोंदलेले नसावे आणि अर्जातील घोषणा कायद्यानुसार असणे आवश्यक आहे.

पत्ता बदलला नसेल तरी नाव पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

ज्या मतदारांचा पत्ता बदललेला नाही, त्यांनाही एन्यूमरेशन फॉर्म सादर करता येणार आहे. यासाठी स्वाक्षरी केलेल्या फॉर्मसोबत निर्धारित वेळेत अर्ज का भरता आला नाही, याचे कारण द्यावे लागेल. हा अर्ज मतदार स्वतः किंवा कुटुंबातील सदस्यामार्फत निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी (AERO) किंवा बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्याकडे जमा करू शकतात. ECINET च्या माध्यमातून ई-साइन करून ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध असेल.

Election Commision
Omraje Nimbalkar News : ओमराजे निंबाळकर अमित शहांच्या भेटीला, दुसरीकडे पुण्यात भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंच्या पोस्टरबाजीची जोरदार चर्चा!

सर्वोच्च न्यायालयानेही उपस्थित केले होते प्रश्न

यापूर्वी 28 ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने SIR प्रक्रियेदरम्यान नाव वगळलेल्या जुन्या मतदारांना फॉर्म-6 भरण्यास सांगण्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. वेळेत एन्यूमरेशन फॉर्म जमा करता आला नाही म्हणून एखाद्या नागरिकाचा मतदानाचा अधिकार कायमचा हिरावून घेतला जाऊ शकतो का, अशी विचारणा न्यायालयाने केली होती.

त्यानंतर निवडणूक आयोगाने अतिरिक्त व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे SIR प्रक्रियेत मतदार यादीतून नाव वगळले गेलेल्या पात्र नागरिकांना पुन्हा नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, दुबार नोंदणी होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.