Waqf Amendment Bill : सर्वात मोठी बातमी! वक्फ दुरुस्ती विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; राष्ट्रपती मुर्मू यांनी दिली मंजुरी

President Murmu approves Waqf Board Amendment Bill : राष्ट्रपतींच्या मंजुरीपूर्वी वक्फ विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेने प्रदीर्घ चर्चेनंतर मंजूर केले होते.
President Murmu approves Waqf Board Amendment Bill
President Murmu approves Waqf Board Amendment BillSarkarnama
Published on
Updated on

Waqf Bill 2025 latest update : वक्फ दुरुस्ती विधेयक २०२५ आता कायद्याक रूपांतरित झाले आहे. या विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुंजरी दिली आहे. राष्ट्रपतींच्या मंजुरीपूर्वी वक्फ विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेने प्रदीर्घ चर्चेनंतर मंजूर केले होते.

संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. यातच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी X वर पोस्ट करत वक्फ दुरुस्ती विधेयकावर आपली भूमिका मांडत 'हे विधेयक अल्पसंख्याकांना त्रास देण्यासाठी आणले गेले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

President Murmu approves Waqf Board Amendment Bill
Waqf Amendment Bill Update : वक्फ विधेयक पास होताच भाजपच्या मित्रपक्षाला धक्यावर धक्के! पाच जणांनी पक्ष सोडला अन्...

लोकसभेत मंजूर झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी(ता.3) दुपारी 1 वाजता राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केलं होतं. यानंतर गेल्या 12 तासांपेक्षा जास्त काळ राज्यसभेत या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा झडली. अखेर मध्यरात्री उशिरा राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान पार पडलं. लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही वक्फ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) शुक्रवारी (ता.4 एप्रिल) मध्यरात्री मंजूर करण्यात आलं होतं.

राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मध्यरात्री उशिरा 2. 35 वाजण्याच्या सुमारास मंजूर करण्यात आलं. वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूनं 128 मतदान, तर विरोधात 95 इतकं मतदान करण्यात आलं.अखेर मोदी सरकारनं मोठं यश मिळवत वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आलं होतं. गुरुवारी दुपारी 1 वाजल्यापासून ते रात्री 2 वाजेपर्यंत या विधेयकाच्या मंजुरीसाठी राज्यसभेत आधी चर्चा आणि नंतर मतदान प्रक्रिया पार पडली होती.

President Murmu approves Waqf Board Amendment Bill
Waqf Amendment Bill : 'वक्फ'मुळे भाजपच्या मित्रपक्षात खळबळ; थेट महासचिवांनी सोडला पक्ष

लोकसभेत एनडीएचे संख्याबळ 293 असून जे 542 सदस्यांच्या सभागृहात बहुमताच्या संख्येपेक्षा साहजिकच पुढे होते.तसेच राज्यसभेतही एनडीएने बहुमताचा आकडा पार केला आहे. कारण राज्यसभेतील एकूण खासदारांची संख्या ही 236 आहेत,ज्यात 2 अपक्ष आणि 6 नामनिर्देशित खासदार आहेत, जे नेहमीच सरकारच्या समर्थनार्थ मतदान करताना दिसून आले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com