Waqf Amendment Bill : 'वक्फ'मुळे भाजपच्या मित्रपक्षात खळबळ; थेट महासचिवांनी सोडला पक्ष

BJP-RLD Alliance Crisis News : लोकसभेसह राज्यसभेतही वक्फ सुधारित विधेयक मंजूर झाले आहे. त्यानंतर आता एनडीएतील अनेक मुस्लिम नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात झाली आहे.
Waqf Amendment Bill
Waqf Amendment BillSarkarnama
Published on
Updated on

RLD Political News : वक्फ सुधारित विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर एनडीएमध्ये भूकंप होण्यास सुरूवात झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि संयुक्त जनता दलाला गुरूवारीच धक्का बसला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने राजीनामा दिला आहे. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या उत्तर प्रदेशातील पक्षाच्या महासचिवांनीच रामराम ठोकला आहे.

उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोकदलाचे (आरएलडी) प्रदेश महासचिव शाहजेब रिझवी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षाने वक्फ बिलाला पाठिंबा दिल्याने नाराज होत राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका व्हिडीओतून पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्या जोरदार टीका केली आहे.

Waqf Amendment Bill
Marathi in Banks : बँकांमध्ये मराठी हवी की नको? मनसेच्या आंदोलनाआधीच रिझर्व्ह बँकेने केलंय स्पष्ट...

लोकसभा निवडणुकीआधीच जयंत चौधरी यांनी समाजवादी पक्षाची साथ सोडत एनडीएमध्ये दाखल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतही त्यांना चांगले यश मिळाले होते. वक्फ विधेयकावरून त्यांनी यापूर्वीच आपली भूमिका स्पष्ट केली होती. पण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आता पक्षाला झटके बसू लागले आहेत.

शाहजेब रिझवी यांनी म्हटले आहे की, मुस्लिमांनी जयंत चौधरी यांना पाठिंबा दिला होता. पण त्यांनी समाजासोबत न्याय केला नाही. ते धर्मनिरपेक्षतेच्या मार्गातून भटकले आहेत. त्यांची धोरणे समाजाच्या हिताच्या विरोधात आहेत. मुस्लिमांनी चौधरींना भरभरून मते दिली. पण त्यांनी वक्फला समर्थन दिल्याने आमच्या भावना दुखावल्या आहेत.

Waqf Amendment Bill
Ramdas Athawale : आठवलेंनी पुढच्या टर्मचे मंत्रिपद केले फिक्स! खर्गे, नड्डांना टाळी वाजवायला लावली...

दरम्यान, जेडीयूमध्ये राजीनामा सत्र सुरूच आहे. आतापर्यंत पाच नेत्यांनी राजीनामा दिला आहे. अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सचिव मोहम्मद शाहनवाज मोहम्मद, प्रदेश महासचिव तबरेज अलीग, दिलशान रेन मोहम्मद कासिम अंसारी, तरबेज हसन या नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

प्रामुख्याने बिहार आणि उत्तर प्रदेशातील एनडीएतील मुस्लिम नेत्यांमध्ये वक्फवरून नाराजी निर्माण झाली आहे. बिहारमध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासाठी हे राजीनामासत्र अडचणीचे ठरू शकते. जेडीयूमधील आणखी काही नेते राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com