Waqf Amendment Bill : राज्यसभेत 'वक्फ' दुरुस्ती विधेयक पारित करण्यात नसणार कोणताही अडथळा?

NDA Power in Rajya Sabha : जाणून घ्या, NDAआघाडीकडे किती आहे बहुमत अन् विरोधकांकडे किती आहेत राज्यसभा सदस्य? ;
Rajya Sabha
Rajya Sabha Sarkarnama
Published on
Updated on

Waqf Amendment Bill in Rajya Sabha : मोदी सरकारने अशातच वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केलं आहे. यानंतर वक्फ(दुरुस्ती)विधेयक2024साठी जेपीसीचे गठण करण्यात आले. यामध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षांच्या २१ खासदारांचा समावेश केला गेला आहे.

विधेयकावरून सातत्याने गदारोळ सुरू आहे. एनडीए कडे लोकसभेत बहुमत आहे, त्यामुळे इथे हे विधेयक पास करण्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. तेच जर राज्यसभेबाबत बोलायचं झालं तर सहा नामनिर्देशित सदस्यांच्या पाठिंब्याने त्यांच्याकडे थोडे बहुमत आहे. त्यामुळे वरच्या सभागृहात जाण्याचा मार्गही मोकळा आहे.

अशातच झालेल्या पोटनिवडणुकांनंतर सद्यस्थितीस राज्यसभेत २३४ खासदार आहेत. यामध्ये भाजपचे(BJP) ९६ आणि त्यांच्या मित्रपक्षांचे मिळून ही संख्या ११३ आहे. सहा नामनिर्देशित सदस्य मिळून एनडीएच्या खासदारांची संख्या ११९ होत आहे, जी ११७ या बहुमताच्या आकड्यापेक्षा दोन जागांनी जास्त आहे.

राज्यसभेत काँग्रेसचे २७ सदस्य आहेत आणि त्यांच्या सहकारी पक्षांचे ५८ सदस्य आहेत. हे सर्व मिळून विरोधी पक्षांची एकूण सदस्य संख्या ८५ झाली आहे. प्रमुख तटस्थ पक्षांमध्ये नऊ सदस्य असलेले वायएसआर काँग्रेस आणि सात सदस्य असणारी बीजेडीचा समावेश आहे. अण्णाद्रमुकचे चार सदस्य, तीन अपक्ष सदस्य आणि लहान पक्षांचे अन्य सदस्य जे दोन्ही मोठ्या गटांपैकी कोणाशीही जुडलेले नाही.

Rajya Sabha
Delhi Waqf Scam : ‘वक्फ’च्या राजकीय गोंधळातच ED कडून आमदाराला अटक; कोणत्या घोटाळ्याचा केला पर्दाफाश?

जम्मू-काश्मीर(Jammu)मधून राज्यसभेच्या चार जागा रिक्त आहेत. कारण, केंद्रशासित प्रदेशाला आतापर्यंत आपली पहिली विधानसभा मिळालेली नाही. यामुळे राज्यसभेच्या संख्येत घट होवून २४१ झाली आहे. सद्यस्थितीस 11 जागा रिक्त आहेत. यापैकी जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश आणि नामनिर्देशित चार-चार जागा रिक्त आहेत. तर ओडिशामध्ये एक जागा रिक्त आहे. वायएसआरसीपीच्या दोन आणि बीजेडीच्या एक सदस्याने नुकताच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे.

बीजेडीचे सदस्य सुजीतकुमार अशातच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांची पोटनिवडणूक जिंकण्याची शक्यता आहे कारण ओडिशा विधानसभेत त्यांच्याकडे पुरेसे समर्थन आहे. वायएसआरसीपीचे दोन सदस्य वेंकटरमण राव आणि बी मस्तान राव यांनी मागील महिन्यात राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. अंदाज वर्तवला जात आहे की हे लोक भाजपचा मित्र पक्ष असणाऱ्या टीडीप(TDP)मध्ये सहभागी होवू शकतात, जो पक्ष आंध्र प्रदेशात सत्तारूढ आहे.

Rajya Sabha
Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकाच्या जाळ्यात भाजपचा पाय आणखी खोलात

हे आहेत भाजपचे मित्रपक्ष -

राज्यसभेत भाजपच्या मित्रपक्षांमध्ये जनता दल(यूनायटेड), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(NCP), जनता दल(सेक्युलर), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले), शिवसेना, राष्ट्रीय लोक दल, नॅशनल पीपल्स पार्टी, पीएमके, तामिळ मनीला काँग्रेस आणि यूनायटेड पीपल्स पार्टी लिबरल(यूपीपीएल) यांचा समावेश आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com