West Bengal Election: निवडणूक आयोगानं पुन्हा केली चूक? भाजपच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप केजरीवालांचा आरोप

West Bengal Election: निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत लेटरहेडवर भाजपचा शिक्का उमटवला होता. याप्रकरणी आयोगानं जाहीर माफी देखील मागितली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपला पूरक असा विषय निवडणूक आयोगाकडून घडला आहे.
ECI
ECI
Published on
Updated on

West Bengal Election: निवडणूक आयोगानं काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत लेटरहेडवर भाजपचा शिक्का उमटवला होता. याप्रकरणी आयोगानं जाहीर माफी देखील मागितली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजपला पूरक असा विषय निवडणूक आयोगाकडून घडला आहे. त्यामुळं निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर नाचत असल्याचा आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

नेमका प्रकार काय?

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. राजकीय पक्षांचा प्रचार सुरु असून निवडणूक आयोगाकडून प्रचारावर तसंच गैरप्रकारांवर बारीक लक्ष आहे. त्यामुळं यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.२० वाजता एक ट्विट करण्यात आलं आहे. या ट्विटमध्ये 'निवडणूक आयोगाचा तृणमूल काँग्रेसला इशारा...पश्चिम बंगालमध्ये यंदाच्या निवडणुका भयमुक्त, हिंसामुक्त, धमकीमुक्त, प्रलोभनमुक्त, छापामुक्त, बुथ आणि जॅमिंगमुक्त होतील' असा मजकूर लिहिलेला आहे.

ECI
Ashwini Deshmukh: मस्साजोग सरपंच निवडणुकीत मोठा ट्विस्ट! संतोष देशमुख यांच्या पत्नीची एन्ट्री; निवडणूक बिनविरोध होणार?

नेमक्या या मजकुरावरुनच निवडणूक आयोग टार्गेटवर आलं आहे. विरोधकांनी आणि युजर्सनं आयोगाला धारेवर धरलं आहे. कारण या ट्विटमध्ये उल्लेख केलेला पक्ष हा पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेला पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस असून भाजपचा तो प्रमुख विरोधक आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन अशा प्रकारे थेट एखाद्या राजकीय पक्षाचं नाव घेऊन त्यांना इशारा देणं चुकीचं आहे. एखाद्या हिंसाचाराच्या घटनेत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते किंवा नेते जबाबदार असू शकतात. त्यामुळं थेटपणे कुठल्याही पक्षाच नाव घेण्यापेक्षा जो कोणी हिंसेला किंवा निवडणुकीदरम्यानच्या गैरप्रकाराला कारणीभूत असेल त्याच्यावर कारवाई होईल किंवा असे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत, अशी भूमिका निवडणूक आयोगानं घ्यायला हवी, असं युजर्सनं म्हटलं आहे.

ECI
MPSC Result: MPSC राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर! आरती जाधव महिलांमध्ये पहिली, टॉपर ठरला विजय लमकाने

पण निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसचं थेट नाव घेऊन या पक्षालाच हिंसेसाठी जबाबदार धरुन या पक्षाला इशारा देणं हा मजूकर भाजपच्या आयटी सेलच्या टीमनं लिहून दिला असून तो भाजपच्याच आयटीसेलनं निवडणूक आयोगाच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला असावा किंवा निवडणूक आयोगानं तो भाजपच्या आयटीसेलकडून घेऊन स्वतःहून पोस्ट केला असावा असा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे. या ट्विटवर अनेक कमेंट्सही आल्या असून यामध्ये देखील युजर्स अशाच प्रकारचे सवाल उपस्थित करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com