Baramati Election Results: बारामतीकरांनी नवा इतिहास घडवला..! सुनेत्रा पवारांनी अजितदादांचाच नव्हे, तर 'साहिबाबाद'च्या शर्मांचाही 'रेकॉर्ड' मोडला

Baramati By Election 2026 : राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी 2 लाख 17 हजार 875 इतक्या विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवला.
Baramati By Election .jpg
Baramati By Election .jpgSarkarnama
Published on
Updated on

Baramati News: राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक पार पडली. या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी 2 लाख 17 हजार 875 इतक्या विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवला.

स्वातंत्र्यांनंतर भारतात झालेल्या विधानसभा निवडणुकीत आजपर्यंत 2022 मध्ये गाझियाबाद मधील साहिबाबाद येथील उमेदवार सुनीलकुमार शर्मा यांना 2 लाख 14 हजार 835 इतके मताधिक्य होते, हाच विक्रम होता. पण आता तोच विक्रम बारामतीत मोडला गेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी सोमवारी (ता.4) इतिहास घडवत 2 लाख 17 हजार 875 इतके प्रचंड मताधिक्य मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आर.वाय. घुटुकडे यांना 931 मते मिळाली. अभिजित बिचुकले यांना 332 तर करुणा मुंडे यांना 300 मते मिळाली. नोटाला 773 इतकी मते मिळाली आहेत. सर्वच विरोधी उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त होणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान पार पडले. महायुतीसह महाविकास आघाडीनेही सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवारच दिलेले नसल्याने ही लढत एकतर्फी झालेली होती. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी प्रयत्न केले, परंतु त्याला अपयश आले. या निवडणूकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी अपेक्षेनुसार पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. सर्व विरोधकांना मिळून 4128 मते मिळाली आहेत.

Baramati By Election .jpg
Auto Driver Vijay Dhamu : थलपतीने हाती दिलं राजकीय स्टेरींग : तामिळनाडूत रिक्षा चालक झाला आमदार, दिग्गज नेत्याचा पराभव

कार्यकर्ते व मतदारांचीच निवडणूक...

अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघात कमालीच्या दुःखाचे वातावरण होते. गेल्या अनेक वर्षात अजित पवार यांनी बारामतीच्या सर्वांगिण विकासासाठी जे योगदान दिले, त्याची उतराई म्हणून सुनेत्रा पवार यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्ते व मतदारांनीच निवडणूक हातात घेतली होती.

बारामती पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी राहिल्यानं विक्रमापासून वहिनी दूर राहणार की काय अशी भीती शेवटपर्यंत कार्यकर्त्यांना सतावत होती. प्रत्यक्षात बारामतीच्या मतदारांनी अजितदादांना श्रध्दांजली देण्याच्या हेतूने सुनेत्रावहिनींना ऐतिहासिक मताधिक्य मिळवून दिले.

Baramati By Election .jpg
Devendra Fadnavis phone Call : देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ फोन अन् खेळ पलटला! राहुरी निवडणुकीचा खरा 'टर्निंग पॉइंट' उघड!

कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले....

वहिनी ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यासाठी जिवाचे रान केलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. अजितदादांच्या जिवाला जिव देणा-या कार्यकर्त्यांनी दादांच्या पश्चात वहिनींना ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे जय पवार यांनीही सगळया कार्यकर्त्यांचे आभार मानले.

पती-पत्नीचा विक्रम.....

2019 मध्ये अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा 1 लाख 65 हजार 265 मतांनी पराभव करत राज्यात सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. बारामतीच्या पोटनिवडणूकीत सुनेत्रा पवारांनी 2 लाख 17 हजार 875 मतांचे मताधिक्य मिळवित दादांचाही विक्रम मोडीत काढला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com