West Bengal Exit Poll : पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागणार; एक्झिट पोल समोर, कुणी पलटवला डाव?

BJP vs TMC election : पीपल्स पल्सचा एक्झिट पोल वगळता अन्य सर्व एक्झिट पोलने काँग्रेस व डाव्यांनाही भोपळाही फोडता येणार नाही, असे आकडे दिले आहेत.
West Bengal Election
West Bengal ElectionSarkarnama
Published on
Updated on

BJP victory prediction Bengal : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडताच पाचही राज्यातील एक्झिट पोल समोर आले आहेत. सर्वाधिक काँटे की टक्कर बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये होती. मागील १५ वर्षांपासूनची सत्ता टिकविण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी कंबर कसली होती. तर भाजपनेही संपूर्ण ताकद पणाला लावली होती.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बंगालमध्ये यंदा सत्तांतर होण्याची शक्यता आहे. भाजप राज्यात पहिल्यांदाच सत्ता काबीज करू शकते, असे एक्झिट पोलचे आकडे सांगतात. मात्र, तृणमूल व भाजपला मिळणाऱ्या जागांमध्ये फारसे अंतर नसेल, असेही आकड्यांवरून दिसते. राज्यात भाजपची सत्ता आल्यास ममतादीदींसाठी हा मोठा झटका असेल.

एक्झिट पोलचे अंदाज

बंगालमध्ये एकूण २९४ जागा असून १४७ ही मॅजिक फिगर आहे. मॅट्रिझ संस्थेच्या अंदाजानुसार, तृणमूल आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असू शकते. या एक्झिट पोलनुसार तृणमूलला १२५ ते १४० तर भाजपला १४६ ते १६१ जागा मिळू शकतात. चाणक्य स्ट्रटेजीजच्या एक्झिट पोलमध्येही दोन्ही पक्षांमध्ये जोरदार लढत दिसत असली तर भाजपला अधिक जागा मिळताना दिसत आहेत.

West Bengal Election
West Bengal election voting : बंगालमध्ये पहिल्या 4 तासांतच मोठा खेळ, रेकॉर्ड होणार; मतदान सुरू असतानाच खुद्द PM मोदींनीच दिले संकेत...

चाणक्यच्या अंदाजानुसार, भाजपला बंगालमध्ये १५० ते १६० आणि तृणमूलला १३० ते १४० जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार मात्र बंगालमध्ये ममतांची सत्ता कायम राहू शकते. या पोलमध्ये टीएमसीला ११७ ते १८७ जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर भाजपला ९५ ते ११० जागांपर्यंतच समाधान मानावे लागू शकते.

West Bengal Election
भाजपने देशभरातील नेत्यांची फौज उतरवली, पण ममतांदीदींच्या 'या' वाघिणीने मारले मैदान...

पी-मार्क संस्थेनेही भाजपला सत्ता मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे. या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला १५० ते १७५ तर ममतांचा पक्ष ११८ ते १३८ जागांपर्यंतच मजल मारू शकतो, असा अंदाज आहे. या सर्व एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांची पुन्हा वाताहात होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पीपल्स पल्सचा एक्झिट पोल वगळता अन्य सर्व एक्झिट पोलने काँग्रेस व डाव्यांनाही भोपळाही फोडता येणार नाही, असे आकडे दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com