West Bengal government : पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजप सरकारने आपल्यास खासदाराला दिलेला प्रतिष्ठेचा पुरस्कार परत घेतला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत चर्चांना उधाण आले आहे. खासदाराने नेमकी कुठली गंभीर चूक केली, याबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहे. सरकारने याबाबत आपली भूमिका स्पष्टही केली आहे.
भाजपचे राज्यसभेचे खासदार नागेंद्र रॉय यांना राज्य सरकारकडून देण्यात आलेला 'बंग विभूषण' हा पुरस्कार परत घेण्यात आला आहे. राज्याच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्या काळात फेब्रुवारी महिन्यातच रॉय यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता राज्यात अनंत महाराज म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या रॉय यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
अनंत महाराज यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला होता. त्यावर मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या सरकारने कठोर भूमिका घेत पुरस्कार परत घेण्याचा निर्णय घेतला. अनंत महाराज यांनी थेट गांधी-नेहरू यांच्या आंदोलन आणि स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासावरच प्रश्न उपस्थित केले होते.
सुभाष चंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेवर प्रश्न उपस्थित करत रॉय म्हणाले होते की, नेताजींच्या वडिलांकडे कोणती सत्ता होती का? की, ते स्वत:च आझाद हिंद सेना तयार करत होते? खरंतर ते ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिक होते. जर्मनीने त्या ब्रिटिश सैनिकांना बंदी बनवून नंतर नेताजींकडे सोपविले होते. नेताजींनी त्या संधीचा चुकीचा वापर केल्याचा दावा रॉय यांनी केला होता. या दाव्यानंतर राज्यात वाद निर्माण झाला होता.
अनंत महाराज यांच्या या विधानानंतर सुवेंदू अधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अशाप्रकारची विधाने सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट केले होते. सरकार अशा विचारांचे समर्थन करत नाही, असे सांगत त्यांनी कायदेशीर कारवाईचाही इशारा दिला होता. त्यानंतर काही तासांतच अनंत महाराजांना दिलेला पुरस्कार परत घेण्यात आला आहे. राज्याच्या राजकारणातील ही मोठी घडामोड मानली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.