Nashik News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार नुकताच घडला आहे. यावरुन राष्ट्रवादी आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
या दोन्ही नेत्यांना धमकी देणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी सटाणा तालुका कॉंग्रेस पदाधिकारी यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी सटाणा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, बाजार समितीचे माजी सभापती नानाजी दळवी, संचालक संजय बिरारी, माजी नगराध्यक्ष विजय वाघ, पांडुरंग सोनवणे, भरत खैरनार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, कोषाध्यक्ष नितीन सोनवणे, लालचंद सोनवणे, उपजिल्हा प्रमुख गजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत सोनवणे, शहराध्यक्ष रवींद्र सोनवणे, माजी नगरसेवक अरविंद सोनवणे, माजी शहराध्यक्ष शरद शेवाळे, शहर संघटक राजनसिंग चौधरी, राजेंद्र खानकरी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. अनिल पाटील, किशोर कदम उपस्थित होते.
वर्धापनदिनानिमित्त बाईक रॅली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. सटाणा बस आगाराच्या आवारात डॉक्टर सेलच्या वतीने कार्डिओ पल्मोनरी, सीपीआर माहिती व ट्रेनिंग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश जगताप, डॉ. व्हि.के.येवलकर, डॉ. दिग्विजय शहा, डॉ.भुषण गांगुर्डे, डॉ.राकेश महाजन यांनी प्रात्यक्षिक दाखवीत मार्गदर्शन केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.