

Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीची नुकतीच दोन दिवसीय 'कॉक्रोच कॉन्क्लेव्ह' पार पडली. यामध्ये विचारमंथन झाल्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी मोठी घोषणा केली. त्यानुसार सीजेपीचं आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर घेऊन जात असताना येत्या सप्टेंबर महिन्यात क्या बोलती पब्लिक? नावाचं नवं कॅम्पेन सुरु करण्यात येणार आहे. याचा उद्देश काय? हे दिपकेंसह सीजेपीच्या कोअर ग्रुपनं निश्चित केलं आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना दिपके यांनी सांगितलं की, कॉक्रोच जनता पार्टीनं शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नुसता घेऊनच नाही दाखवला तर सरकारला झुकवलं. सरकारला राजीनामा देण्यास भाग पाडलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा आमचा आमचा सर्वात मोठा विजय आहे. आम्हाला वाटतं की जेनझीचा जो सर्वात मोठा विजय होता तो फक्त राजीनामा नव्हता. या देशात जी भीती निर्माण करुन ठेवली होती, दडपशाही करुन ठेवली होती. या सरकारनं गेल्या दहा-बारा दिवसांत, ती भीती आता देशातील नागरिकांच्या मनातून संपलेली आहे. आता देशातील नागरिक रस्त्यावर येतील आणि प्रश्नही विचारतील. आज एकाचा राजीनामा मागितला यानंतर इतरांचेही राजीनामे मागतील.
बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे की, कॉक्रोच जनता पार्टीची विचारधारा काय? तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी जे स्वप्न पाहिलं होतं, त्यांच्या विचारांवर चालणारी कॉक्रोच जनता पार्टी असणार आहे. आमची विचारधारा तीच असणार आहे जी भारताच्या संविधानाची आहे. यापेक्षा आमची वेगळी विचारधारा नाही, आमची धर्मनिरपेक्ष आहोत, आम्ही लोकशाहीत विश्वास ठेवणारे आहोत, आम्ही लोकशाहीवादी लोक आहोत. आम्ही सामाजिक न्यायासाठी कायम प्रयत्न करणार आहोत, हीच आमची विचारधारा आहे.
यापुढे कॉक्रोच जनता पार्टी काय करणार? हा अनेकांना प्रश्न पडला आहे. मागच्या दोन दिवसांत आम्ही जी चर्चा केली त्यावर आम्ही हे ठरवलं की येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉक्रोच जनता पार्टी एक देशव्यापी कॅम्पेन करणार आहे, त्याचं नाव असेल क्या बोलती पब्लिक? या कॅम्पेनद्वारे आम्ही देशभरात फिरणार आहोत आणि लोकांकडून समजून घेणार आहोत की त्यांच्या समस्या काय आहेत?, त्यांच्या अपेक्षा काय आहेत?
दरम्यान, या कॅम्पेनद्वारे तीन महत्वाच्या गोष्टींवर कॉक्रोच जनता पार्टी काम करणार आहे. यांपैकी पहिला मुद्दा म्हणजे शिक्षण व्यवस्थेत सुधारणा. आज आपल्या देशात शिक्षण हे परवडेनासं झालं आहे. पहिली-दुसरीत मुलांना प्रवेश घेताना त्यांच्यासाठी एक ते दीड लाख रुपये फी आहे, डोनेशन तर वेगळंच आहे. त्याचबरोबर कोचिंगसाठी आणि कॉलेजच्या डिग्रीसाठी पैसा जातो. त्यामुळं आजच्या घडीला आपल्या देशात शिक्षण घेणं म्हणजे डोक्यावर कर्ज करुन घेणं आहे. आम्हाला मुलांना आणि त्यांच्या आई-वडिलांना मुक्त करायचं आहे. शिक्षण हा मुलभूत अधिकार आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत म्हटलं आहे.
दुसरा मुद्दा लोकशाही संस्थानांची जी वाईट अवस्था झाली आहे त्याविरोधातही लोक दिल्लीतल्या आंदोलनात एकवटले होते. लोकांचा राजकीय व्यवस्थेवरुन, न्यायव्यवस्थेवरुन, मीडियावरुन विश्वास उडत चालला आहे. मीडियाला स्वतंत्र बनवणं आणि विश्वासार्हता परत आणणं हे गरजेचं आहे. जोपर्यंत मीडियात स्वतंत्रपणे वागणार नाही तोपर्यंत सरकारला जबाबदार बनवणं शक्य नाही. तसंच बेरोजगारी हा देशातील सर्वात मोठा मुद्दा आहे. ८० टक्के बेरोजागार असे आहेत की त्यांच्याकडं डिग्री आहे. आमचं भविष्य हे देशातील अशिक्षित लोक ठरवत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.