Jharkhand Election 2024 Exit Poll LIVE : झारखंडमध्ये कोणाचे सरकार येणार? काय म्हणतात एक्झिट पोलचे आकडे...

Exit Poll LIVE : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा बुधवारी पार पडला. झारखंडच्या 81 सदस्यीय विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार असून त्यापूर्वीच एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे.
exit polls
exit pollssarkarnama
Published on
Updated on

Political News : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडले. त्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर येऊ लागले आहेत. MATRIZE, INDIA राज्यातील एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार झारखंडमध्ये एक्झिट पोलमध्ये कोणता पक्ष सरकार स्थापन करणार याची उत्सुकता लागली आहे.

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा बुधवारी पार पडला. झारखंडच्या 81 सदस्यीय विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार असून त्यापूर्वीच एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. एक्झिट पोलमध्ये कोणता पक्ष सरकार स्थापन करणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात बुधवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 38 मतदारसंघांमध्ये सुमारे 68 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 12 जिल्ह्यांतील 14 हजार 218 मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी 5 वाजता मतदान संपले, तर 31 मतदान केंद्रांवर मतदान सायंकाळी 4 वाजता संपले.

exit polls
Vinod Tawde on Rahul Gandhi : विनोद तावडेंकडून राहुल गांधींना आव्हान; म्हणाले, नालासोपाऱ्यात या...

झारखंडमध्ये प्रामुख्याने एनडीएविरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत झाली. एनडीएमध्ये भाजप, ऑल झारखंड युवा मोर्चा, जेडीयू, लोकजन शक्ति पार्टी या पक्षांचा समावेश आहे. तर इंडिया आघाडीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, आरजेडी, सीपीआय एमएल या पक्षांचा समावेश आहे.

मॅट्रिझ एक्झिट

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 12 जिल्ह्यांतील 38 जागांसाठी बुधवारी सायंकाळी पाच वाजता मतदान पार पडले. मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार यावेळी झारखंडमध्ये भाजपप्रणित एनडीए सरकार स्थापन करू शकते. झारखंडमधील 81 जागांपैकी एनडीएला 46 आणि इंडिया आघाडीला 29 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 6 जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

exit polls
Vinod Tawde : 'त्या' हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?; तावडेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

अॅक्सिस माय इंडिया

अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये 'इंडिया' आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया आघाडी जादुई आकडा ओलांडताना दिसत आहे. इंडिया आघाडी ही 53 जागा तर एनडीए 25 जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर जेएलकेएमला दोन आणि इतरांना एक जागा मिळण्याचा अंदाज या एक्जिट पोलने वर्तवला आहे.

पीपल्स पल्स

पीपल्स पल्सच्या एक्झिट मध्ये भाजप आघाडी 50 च्या वर असल्याचे दाखवण्यात आले आहे. एनडीए आघाडीला जास्तीत जास्त 53 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा आहेत. पीपल्स पल्सचे एक्झिट पोलचे आकडे बरोबर ठरले तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजदला मोठा धक्का बसू शकतो. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारची राजवट संपुष्टात येऊ शकते.

exit polls
Congress Leaders Vote: काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क ; नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन!

मताधिक्य मिळवूनही भाजपचा झाला होता पराभव

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकली तर मताधिक्य मिळूनही भाजप इतर पक्षाच्या तुलनेत मागे पडला होता.33.37 टक्के मते मिळवूनही केवळ 25 जागांवर भाजपला विजय मिळवता आला, तर जेएमएमने, 18.72 टक्के मते मिळवूनही 30 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत देखील मतदानाची अधिकची आकडेवारी ही महत्वाची भूमिका बजावणार आहे.

exit polls
Maharashtra Election : मतदान केंद्रांवर राडा,कार्यकर्ते भिडले; लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com