Maharashtra Election : मतदान केंद्रांवर राडा,कार्यकर्ते भिडले; लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट

Maharashtra election voting BJP NCP Shivsena Congress : परळीमधील एका मतदान केंद्रावर अधिकचा पोलिस बंदोबस्त मागवाला लागला. मतदान शांततेत सुरू असताना झालेल्या राड्यांमुळे कुठे तरी लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागल्याची चर्चा आहे.
Maharashtra election
Maharashtra election sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीसाठी आज मोठ्या उत्साहात मतदान होत आहे. दुपारी तीन वाजता मतदानाचा टक्का 54 टक्के होता. यावरून मतदारांचा उत्साह दिसून येतो आहे. मात्र, मतदान होत असताना मतदान केंद्राबाहेर, मतदारसंघात मोठ्या प्रमाणत कार्यकर्ते, नेते एकमेकांना भिडल्याच्या घटना घडल्या.

काही ठिकाणी पोलिसांना मध्यस्थी करावी लागले. तर, परळीमधील एका मतदान केंद्रावर अधिकचा पोलिस बंदोबस्त मागवाला लागला. मतदान शांततेत सुरू असताना झालेल्या राड्यांमुळे कुठे तरी लोकशाहीच्या उत्सवाला गालबोट लागल्याची चर्चा आहे.

Maharashtra election
Rohit Pawar Vs Ram Shinde : मतांसाठी नोटा बदाबदा गळं..; पवार अन् शिंदेमधला 'वॉर' टोकाला

जैन-मेहतांचे समर्थक भिडले

मिरा-भाईंदर मतदारसंघात भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचे स्वीय सहाय्यक,कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे समर्थक भिडले. भाईंदर पश्चिमेच्या अहिंसा चौक जवळ ही घटना घडली.नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळी पोहोचत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.येथे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कोपरखैरणे विभागात राडा

ऐरोली विधानसभेत कोपरखैरणे विभागात मोठा राडा झाला. स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांनी भाजपाचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांच्या मुलाला मारहाण केली.कोपरखैरणे येथील कार्यालयाबाहेर लागलेल्या बूथवर येऊन मारहाण केल्याचे सांगत येत आहे.तर शंकर मोरे यांच्या मुलाने भरारी पथक घेऊन कोपरखैरणे येथे स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला, असा आरोप अंकुश कदम यांनी केलाय. कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलो असता शंकर मोरे यांच्या मुलाने पहिला हात उचलल्याने स्वरक्षणासाठी आम्ही देखील मारहाण केल्याची माहिती अंकुश कदम यांनी म्हटले आहे.

दोन गटात तुंबळ हाणामारी

बीडच्या केज मतदारसंघातील विडा गावात मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शुल्लक कारणावरून हाणामारी झाली. मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्यान वातावरण शांत झाले.

कसबा बावडामध्ये तणाव

कोल्हापुरातील कसबा बावडामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षातील कार्यकर्ते आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये वाद झाला. बावडा येथील एक मतदान केंद्रानाजीकच्या बूथवर हा वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते सुनिल जाधव आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते राहुल माळी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून बाचबाची झाली. काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा आवाहन केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन कराळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. बूथवर जात असताना नितीन कराळे यांना मारहाण करण्यात आली.

Maharashtra election
Vidhansabha Election Voting : मतदानाच्या दिवशीच उमेदवार अन् मतदाराचा मृत्यू ; तर अधिकाऱ्यास हृदयविकाराचा झटका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com