Sanjay Raut On Women Reservation: संसद उद्घाटनावेळी महिला राष्ट्रपतींना का डावललं ? आरक्षणावरून राऊतांनी मोदींना डिवचलं!

Sanjay Raut On Narendra Modi : आरक्षण देऊन महिलांचं सक्षमीकरण होणार का? संजय राऊत
Sanjay Raut On Women Reservation :
Sanjay Raut On Women Reservation : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : संसदेच्या विशेष अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनात मांडल्या गेलेल्या ऐतिहासिक अशा 'महिला आरक्षण विधेयका'वर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या विधेयकावर आपली सविस्तर भूमिका मांडणार आहेत, तर यावर विविध पक्षांनी आपली भूमिकाही यापूर्वीच स्पष्ट केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत भाष्य करताना मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Sanjay Raut On Women Reservation :
CM Ask Raut ? : ‘राऊत आले नाहीत का,?’ ; मुख्यमंत्र्यांचा भर पत्रकार परिषदेत सवाल

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. राऊत म्हणाले, "महिला आरक्षणासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर सरकारला विरोध दर्शवण्याचं काही कारण नाही. मात्र, माझा एक प्रश्न आहे की, ज्यावेळी नव्या संसद भावन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, तेव्हा महिला असलेल्या राष्ट्रपतींना का डावलण्यात आलं? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

आरक्षण देऊन महिलांचं सक्षमीकरण होणार का? संजय राऊत

एकीकडे राज्यात-देशात महिलांवर अत्याचारात वाढ झाली आहे. महिला सुरक्षिततेचा प्रश्न आहे. असे असताना केवळ महिलांनाआरक्षण देऊन, त्यांचे राजकीय आरक्षण वाढवून, महिला सक्षमीकरण होणार आहे का? असा सवाल राऊत यांनी विचारला आहे .

(Edited by - Chetan Zadpe)

Sanjay Raut On Women Reservation :
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकाची 'टाईमलाईन' पाहता तो मोदी सरकारचा 'चुनावी जुमला'...? राष्ट्रवादीच्या खासदाराचा हल्लाबोल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com