CJI Surya Kant on Artificial Intelligence : न्यायाधीशांची जागा आता AI घेणार? CJI सूर्य कांत यांच्या 'त्या' विधानाने खळबळ!

Artificial Intelligence in Indian courts : मुख्य न्यायाधीश सूर्य कांत यांनी न्यायव्यवस्थेत AI च्या वापराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात चर्चा सुरू झाली आहे. AI न्यायाधीशांची जागा घेऊ शकते का?
CJI Surya Kant Supreme Court judgment on voter list revision
CJI Surya Kant Supreme Court judgment on voter list revisionSarkarnama
Published on
Updated on

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे न्यायव्यवस्थेत मोठे बदल घडत असताना, न्यायाधीशांची भूमिका भविष्यात AI घेणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. मात्र भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडत न्यायव्यवस्थेत AI ची भूमिका काय असावी यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

ऑक्सफर्डमधील एका कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने नेहमीच तंत्रज्ञानाकडे मानवी विचारप्रक्रियेला मदत करणारे साधन म्हणून पाहिले आहे. AI किंवा इतर कोणतेही तंत्रज्ञान न्यायाधीशांच्या स्वतंत्र निर्णयक्षमतेची जागा घेऊ शकत नाही. न्यायदान ही केवळ कायद्याची प्रक्रिया नसून त्यामध्ये सामाजिक वास्तव, मानवी मूल्ये आणि संवेदनशीलतेचाही विचार करावा लागतो, असे त्यांनी नमूद केले.

CJI Surya Kant Supreme Court judgment on voter list revision
Big Offer to Navneet Rana : एवढं चांगलं व्यक्तिमत्त्व राष्ट्रवादीनं सोडलं! नवनीत राणांना साद घालत बच्चू कडूंचा भाजपवर राजकीय बॉम्ब

भारतीय न्यायव्यवस्थेच्या गरजा लक्षात घेऊन स्वदेशी AI प्रणाली विकसित करण्याच्या शक्यतांवर सध्या गांभीर्याने काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. ही प्रणाली भारताच्या संविधानिक मूल्यांशी, विविध भाषांशी आणि सामाजिक परिस्थितींशी सुसंगत असेल, यावर भर दिला जात आहे. परदेशी तांत्रिक मॉडेल्सवर पूर्णपणे अवलंबून न राहता भारतीय संदर्भात न्यायशास्त्र विकसित करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

यावेळी त्यांनी न्यायव्यवस्थेतील तरुण पिढीच्या योगदानाचाही विशेष उल्लेख केला. युवा वकील, न्यायिक अधिकारी आणि कायदेविषयक व्यावसायिक तंत्रज्ञानाशी झपाट्याने जुळवून घेत असून न्यायालयीन व्यवस्थेतील डिजिटल बदलांना गती देत आहेत, असे ते म्हणाले. जिल्हा न्यायालयांपासून ते सरकारी वकील आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कायदेशीर सल्लागारांपर्यंत अनेक तरुण व्यावसायिक सुधारणा प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होत आहेत.

CJI Surya Kant Supreme Court judgment on voter list revision
Farm Loan Waiver : कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना लाभ होणार अन् किती पैसे खात्यात जमा होणार कृषिमंत्र्यांनी थेट आकडाच सांगितला

सरन्यायाधीशांच्या वक्तव्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, AI हे न्यायव्यवस्थेचे सहाय्यक साधन ठरू शकते; मात्र न्यायाधीशांच्या जागी ते बसणार नाही. अंतिम निर्णय मानवी विवेक, अनुभव आणि न्यायबुद्धीच्या आधारेच घेतले जातील, अशी भूमिका न्यायपालिकेने कायम ठेवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com