Supreme Court : महिला न्यायाधीशाचा लैंगिक छळ; थेट सरन्यायाधीशांकडे मागितली इच्छामरणाची परवानगी

DY Chandrachud : अलाहबाद न्यायालयाकडून सविस्तर अहवाल मागितला आहे.
CJI Dhananjaya Chandrachud News
CJI Dhananjaya Chandrachud NewsSarkarnama
Published on
Updated on

Utter Pradesh News : उत्तर प्रदेशातील एका महिला न्यायाधीशालाच शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तरप्रदेशातील अलाहाबाद जिल्हा सत्र न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशाने महिला न्यायाधीशांकडे अनुचित मागण्या करत त्यांचा शारीरीक आणि मानसिक छळ केल्याचा प्रकार एका पत्रातून समोर आला आहे. या प्रकरणी महिला न्यायाधीशाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहून इच्छा मरणाची परवानगी मागितली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या पत्राची दखल घेत अलाहबाद न्यायालयाकडून सविस्तर अहवाल मागितला आहे.

पीडित महिला न्यायाधीशाने सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की 2022 पासून मी अलाहाबाद न्यायालयाच्या (Allahabad High Court) अंतर्गत बाराबंकी या न्यायालयात कार्यरत होते. न्यायाधीश म्हणून मी लोकांना न्याय देईन अशी आशा होती. मात्र माझी अपेक्षा चुकीची होती. त्या ठिकाणी सेवा बजावत असताना मलाच शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. तेथील जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीशांकडून माझ्याकडे चुकीच्या मागण्या केल्या गेल्या.

तसेच माझा शारीरिक छळ करण्यात आला. मला हीन दर्जाची वागणूक दिली गेली. तसेच रात्रीच्या वेळी भेटीसाठीही बोलावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंबंधी अनेक तक्रारी केल्यानंतरही काहीच दखल न घेतल्याने मला हे पत्र लिहावे लागले असल्याचेही पीडित न्यायाधीश महिलेने स्पष्ट केले आहे.

CJI Dhananjaya Chandrachud News
Trible Politics : विजयकुमार गावितांच्या विधानाने विधानपरिषदेत सदस्य संतापले!

त्यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, मला उच्च न्यायालयात न्याय मिळेल अशी आशा होती. मात्र केवळ 8 मिनिटांमध्ये माझी याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने माझ्या वेदना, माझी तक्रार काय आहे हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यावेळी मला माझी याचिका नाही तर माझा सन्मान झिडकारून लावण्यात आला की काय असे वाटले असल्याचाही उल्लेख त्यांनी सरन्यायाधीशांना लिहलेल्या पत्रात केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पीडित महिला न्यायाधीश यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, भारतात काम करणाऱ्या महिलांना सांगू इच्छिते की त्यांनी आता अत्याचाराचा डाग सोबत घेऊनच जगायला शिकले पाहिजे, हेच सत्य आहे. महिला अत्याचाराविरोधात कोणतीच न्याय व्यवस्था उपलब्ध नाही. आपले कोणी ऐकून घेत नाही आणि हेच सत्य असल्याची हतबलता त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.

CJI Dhananjaya Chandrachud News
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा पुढाकार; दिल्लीत बोलावली खासदारांची बैठक

मरण्याची परवानगी द्या

या सर्व शारीरिक आणि मानसिक त्रासानंतर पीडित महिला न्यायाधीशाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून आपली आपबिती सांगितली आहे. तसेच मागील दीड वर्षापासून माझ्यावर हा प्रसंग ओढवत असल्याने मला आता जगायची इच्छाच राहिलेली नाही. त्यामुळे न्यायालयाने मला मरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी महिला न्यायाधीशाने केली आहे.

(Edited By - Rajanand More)

CJI Dhananjaya Chandrachud News
MS Dhoni : आयपीएस संपत कुमार यांना न्यायालयाचा दणका; धोनीच्या अवमान याचिका प्रकरणात 15 दिवसांचा तुरुंगवास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com