येडियुरप्पांच्या पुत्राला मंत्रिपद नाही पण भाजप सोपवणार मोठी जबाबदारी!

कर्नाटकात मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळाची फेररचना झाली असून, आता भाजपमधील संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
yediyurappa son vijayendra can be given big role in bjp organization
yediyurappa son vijayendra can be given big role in bjp organization
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बदल आणि मंत्रिमंडळाची फेररचना झाली असून, आता भाजपमधील संघटनात्मक बदलांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मंत्रिमंडळात माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचे (B. S.Yediyurappa) पुत्र बी.वाय.विजयेंद्र (B.Y.Vijayendra) यांचा समावेश नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सध्या राज्य भाजपचे उपाध्यक्षपद विजयेंद्र यांच्याकडे असून, त्यांना पक्ष संघटनेत बढती दिली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  

राज्यातील मुख्यमंत्री बदलानंतर आता बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित पक्ष संघटनेतील बदलांचे वारे वाहू लागले आहे. विजयेंद्र यांनी मंत्रिपद नाकारण्यात आल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. असे असले तरी संघटनात्मक बदलांमध्ये त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे. विजयेंद्र यांच्याकडे सध्या पक्षाचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष अथवा सरचिटणीसपदी बढती जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मुख्यमंत्री पदावरून येडियुरप्पा पायउतार झाले असले तरी त्यांनी राज्य सोडून बाहेर जाण्यास ठाम नकार दिला आहे. याचबरोबर राज्यातील राजकारणात सक्रिय राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. यामुळे सरकारवर नसला तरी पक्ष संघटनेवर वर्चस्व कायम ठेवण्याचा येडियुरप्पांचा प्रयत्न आहे. यामुळे त्यांना पुत्रासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे,. मागील वेळीच विजयेंद्र यांनी सरचिटणीस व्हायचे होते. परंतु, हाय कमांडने याला नकार दिला होता. आता मंत्रिपद न  दिल्याने विजयेंद्र प्रदेशाध्यक्ष अथवा सरचिटणीस पदावर दावा करू लागले आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

कर्नाटकात येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई आले आहेत. कर्नाटकात नुकताच मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यावेळी 29 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. नव्या मंत्रिमंडळात जुन्यांसोबत नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले. नव्या मंत्रिमंडळात 7 ओबीसी, 3 अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमाती, 8 लिंगायत, 1 रेड्डी आणि 1 महिला आहे. मंत्रिमंडळात 6 नवीन चेहरे आहेत. यात येडियुरप्पांच्या पुत्राला डावलण्यात आले. येडियुरप्पांनी पुत्राच्या मंत्रिपदासाठी आग्रह धरला होता. परंतु, पक्ष नेतृत्वाने याला महत्व दिले नव्हते. 

विजयेंद्र यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नसल्याचे खुद्द बोम्मई यांनीच जाहीर केले होते. येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना विजयेंद्र हे सुपरसीएम असल्याची टीका मंत्रिमंडळातील सहकारी करीत होते. मुलामुळेच येडियुरप्पांना राजीनामा द्यावा लागला, अशीही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विजयेंद्र यांनी वगळून पक्ष नेतृत्वाने येडियुरप्पांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी येडियुरप्पांशी चर्चा केली होती. याचबरोबर पक्षाचे प्रभारी अरुणसिंह यांनी खुद्द विजयेंद्र यांच्याशी चर्चा केली होती. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com