Yusuf Pathan News : युसूफ पठाणचा विजयाचा षटकार हुकणार?
Bengal News : क्रिकेटपटू युसूफ पठाण यांनी आपले होमपिच गुजरातपासून दोन हजार किलोमीटर अंतरावरील दूरवरच्या पश्चिम बंगालच्या बरहमपूर येथे लोकसभा निवडणुकीसाठी उतरले आहेत. मात्र येथे राजकीय परिस्थिती फारशी अनुकूल नसल्याची परिस्थिती त्यांच्या एकूणच देहबोलीत दिसू लागली आहे. त्यामुळे 'तुम मुझे व्होट दो, मै तुम्हारा काम करुंगा,'अशी डॉयलॉगबाजी करणाऱ्या पठाणला विजयी षटकार मारणे, अवघड असल्याचे दिसते.
बरहमपूर हा मूलत: काँग्रेसचे दिग्गज नेते आणि खासदार अधीररंजन चौधरी यांचा गड मानला जातो. कारण 1991 पासून चौधरी येथून कायम निवडून आले आहेत. सलग पंचवीस वर्षे ते येथून निवडून आले आहेत. चौधरी यांच्या यशाचं गमक कशात आहे, याबाबत बरहमपूरचे व्यापारी माणिक लाल अग्रवाल म्हणतात, चौधरी पुन्हा निवडून येणार. कारण त्यांनी या भागाचा पूर्ण विकास केला आहे. 25 वर्षांपूर्वी बरहमपूर एक जंगल होते. अधीरबाबूंनी लोकांना घरे मिळवून दिली. बेघरांना आसरा दिला. रोजगारासाठी येथे कार्यालये उभारली. सर्वकाही अधीरबाबू यांनीच केले.
मुस्लिमांचे मतांचे वर्चस्व -
या मतदरासंघात जवळपास 40 टक्के मुस्लीम मतदार आहेत. यामुळे येथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले, यात काही आश्चर्य नाही. मात्र काँग्रेसच्या याच वर्चस्वाला धक्का देण्याची रणनीती टीएमसीने आखले आहे. याचसाठी येथून युसूफ पठाणला मैदानात उतरवले आहे. एक मुस्लीम चेहरा, आयपीएलमध्ये कोलकात्याकडून खेळण्याचा पठाणची प्रादेशिक ओळख आहे. पठाण यांचे वास्तव्य बरहमपूरच्या एका महागड्या हॉटेलमध्ये आहे. त्यांच्या दिमतीसाठी गुजरात आणि मुंबई येथीन त्यांची खास टिमही दाखल झाली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या आयपॅकचे कर्मचारीही पठाण यांच्या यंत्रणेत आहेत. त्यांची प्रचारपद्धती एकदम हायटेक आहे. मात्र मतदारांना भुलविणे सोपे राहिलेले नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, खासदार अभिषेक बॅनर्जी, त्यांचे भाऊ इरफान पठाण यांनीही बरहमपूरमध्ये रोड शो करत मतांचे दान मागितले. एवढी यंत्रणा राबवूनही युसूफभाई किती मतं घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बंगाली भाषा महत्त्वाची -
युसूफ केवळ मुस्लिम आहे म्हणून त्याला सरसकट मुस्लिमांची मतं मिळणार नाही, असे येथील व्यापारी अमित मंडल म्हणतात. "पश्चिम बंगालमधील (Bengal) मुस्लिम लोक हे हिंदी भाषेपेक्षा बंगाली भाषाच अधिक चांगले बोलतात. त्यांची रोजची कामाकाजाची भाषा बंगालीच आहे. युसूफ पठाण हे फक्त मला मतदान करा, म्हणत आहेत. याचा फारसा परिणाम येथे होणार नाही. बंगालीतून संवाद साधणे आणि हिंदीतून बोलणे यात फरक आहे, असे मंडल म्हणाले.
भाजपचा उमेदवार भूमिपुत्र -
पठाण आणि चौधरी यांच्या या लढाईत भाजपकडून (BJP) भूमिपत्राची निवड केली आहे. भाजपचे उमेदवार डॉ. निर्मलकुमार साहा हे या मतदारसंघातीलच एक प्रसिद्ध डॉक्टर आहेत. गेल्यावर्षी तेथून भाजपने तब्बल 1 लाख ४३ हजार मते मिळवली होती. तर टीएमसील उमेदवाराला 5 लाख 10 हजार मते मिळाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.