Gujarat riots : गुजरात दंगल!, मोदींवर आरोप करणाऱ्या झाकिया जाफरींचे निधन; अखेरपर्यंत दिला लढा

Ehsan Jafri Gujarat violence : 2002 च्या गुजरात दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेले काँग्रेस खासदार एहसान जाफरी यांच्या पत्नी झाकिया जाफरी यांचे शनिवारी (ता. 1) अहमदाबादमध्ये निधन झाले. गुलबर्ग सोसायटी प्रकरणात त्या सह-तक्रारदार होत्या.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Godhra riots in Gujarat : 2002 च्या गुजरात दंगलीतील काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांचे निधन झाले होते. अहमदाबाद येथे भडकलेल्या दंगलीत गुलबर्ग हाऊसिंग सोसायटीमध्ये जाफरी यांच्यासह 68 जणांची हत्या झाली होती. याप्रकरणी जाफरी यांची पत्नी झाकिया जाफरी यांनी न्यायालयीन लढा उभारला होता. त्यांचे शनिवारी (ता. 1) निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर 63 जणांना एसआयटीने क्लीन चिट दिली होती.

2002 मध्ये अहमदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर धार्मिक हिंसाचार उसळला होता. त्यावेळी मुस्लिम वस्ती असलेल्या गुलबर्ग हाऊसिंग सोसायटीसह गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसच्या एका डब्याला लक्ष करण्यात आले होते. गुलबर्ग हाऊसिंग सोसायटीमध्ये 68 जणांचा तर साबरमती एक्सप्रेसमध्ये 59 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनांनंतरच गुजरातमध्ये दंगली उसळल्या.

यानंतरच दंगलग्रस्तांना न्याय मिळावा आणि दंगलीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी यासाठी झाकिया जाफरी यांनी विविध न्यायालयात लढा उभारला होता. त्यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात देखील दीर्घ कायदेशीर लढा दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या एसआयटीने 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर 63 जणांना क्लीन चिट देत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्याच्याविरुद्ध कोणताही खटला चालणारा पुरावा नसल्याचे त्यात म्हटले आहे.

झाकिया यांनी याच एसआयटीच्या क्लोजर रिपोर्टविरोधात गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जी 2017 मध्ये उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. यानंतर, त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याविरोधात निषेध याचिका दाखल करत दंगलींमागे मोठे कट असल्याचा आरोप केला होता. जो सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळून लावला. न्यायालयाने याचिका फेटाळून लावतानाही काही केलेल्या टिप्पण्यावरून तीव्र टीका झाली होती. ज्यात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन लोकूर यांचाही समावेश होता.

PM Narendra Modi
Narendra Modi : भारत सध्या मिशन मोडमध्ये! अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी PM मोदींनी सांगितला 2047 पर्यंतचा रोडमॅप, म्हणाले...

झाकिया जाफरी यांचा कायदेशीर लढा

गोध्रा रेल्वे कांडांनंतर उसळलेल्या दंगलींना कारणीभूत ठरलेल्या मोठ्या कटासाठी सर्वच राजकीय नेत्यांना जबाबदार धरण्यासाठी झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढाई लढली. तेव्हा त्या राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाल्या. झाकिया जाफरी यांनी मोठ्या कटाच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. ज्यात मोदी आणि इतर 63 जणांना देण्यात आलेल्या क्लीन चिटवर आक्षेप घेण्यात आला होता. 2002 मध्ये मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणात जाफरीची याचिका निराधार ठरवून फेटाळून लावली होती.

झाकिया जाफरींचा नेमका आरोप

28 फेब्रुवारी 2002 रोजी मुस्लिमबहुल गुलबर्ग सोसायटीवर एका जमावाने हल्ला केला. या काळात येथे झालेल्या हिंसाचारात काँग्रेसचे माजी खासदार एहसान जाफरी यांच्यासह एकूण 68 जणांचा मृत्यू झाला. जमावाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी अनेक मुस्लिमांनी एहसान जाफरी यांच्या घरात आश्रय घेतला होता. जमावाने संपूर्ण सोसायटीला चारही बाजूंनी घेरले होते. आणि काही लोकांना जिवंत जाळले. यावेळी एहसान जाफरी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह अनेक शासकीय अधिकारी, पोलिसांशी संपर्क केला होता. मात्र त्यांना कोणीच मदत केली नाही. ज्यात त्यांच्या पतींचा देखील मृत्यू झाला.

PM Narendra Modi
Narendra Modi: चक्क व्यासपीठावरच PM मोदी भाजप उमेदवाराच्या तीन वेळा वाकून पाया पडले! दिल्लीत काय घडलं? VIDEO पाहा

यानंतरच जून 2006 मध्ये, झाकिया यांनी गुजरात पोलिस महासंचालकांना या प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींसह 63 लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्याची विनंती केली. यावेळी त्यांनी, मोदींसह या सर्व लोकांनी दंगलीत अडकलेल्या पीडितांना वाचवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही, असा आरोप केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com