Political Leaders Fitness : नेत्यांचा फिटनेस : 71 वर्षाचे माजी आमदार सांगतात, दररोज योगा का करावा..?

Fitness Story : वडील गावचे पोलिस पाटील. त्यांना व्यायाम करण्याची आवड होती. लहानपणापासूनच त्यांनी आम्हाला व्यायामाचा संस्कार दिला. वयाच्या ७१ वर्ष पूर्ण होत असताना देखील हा संस्कार कायम जपत नियमित व्यायाम व प्राणायाम करीत आहे, असे सांगत लातूरचे भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चाचे गोवा व गुजरातचे प्रभारी तसेच लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आपल्या फिटनेसचे रहस्य सांगत होते.
Shivaji Patil Kavhekar  .jpg
Shivaji Patil Kavhekar .jpgSarkarnama
Published on
Updated on

Fitness News : कव्हा (ता. जि. लातूर) हे आमचे गाव. वडील बळवंतराव पाटील हे गावचे पोलिस पाटील होते. त्यांनाही पहिल्यापासून व्यायामाची आवड होती. त्यांचा दराराही तसाच होता. त्यामुळे व्यायामाचे बाळकडू मला लहानपणीच मिळाले. हळूहळू शरीरालाही तशीच सवय झाली. पुढे चालून व्यायाम हा जीवनाचा अविभाज्य घटकच बनत गेला. पुढे लातूरला महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आलो.

आर्य समाजाशी जोडलो गेलो. आर्यवीर दलाचे अध्यक्ष स्वामी डॉ. देवव्रत आचार्य यांचा सहवास मिळाला. योगासन, प्राणायाम, ध्यान, संध्या, अध्यात्माचे संस्कार त्यांच्याकडून मिळाले. ‘योग को जीवन का अंग बनावो’ हा मंत्र स्वामींनी दिला. योगामुळे शारिरीक व मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त राहता येते.(Fitness) हे अनुभवायला मिळाले.

शाळेत असताना ‘ययाती’ कादंबरी वाचली होती. त्यातून वाचनाची आवड निर्माण झाली. वेगवेगळ्या महापुरुषांची पुस्तके वाचली. कोणाला खरेही वाटणार दररोज देवाची पूजा करीत असताना छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद , गौतम बुद्ध ,महात्मा बसवेश्वर यांची देखील पूजा करतो. यातून वेगळे समाधान मिळते, ऊर्जाही मिळते. गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहे. संघर्षमय जीवनच गेले आहे. अशा काळात योगानेच साथ दिली.

आजही राजकारणासोबतच शैक्षणिक, सामाजिक, अध्यात्मिक क्षेत्रात काम करीत आहे. असे असताना दररोज नियमित पहाटे साडेपाच वाजता उठून दीड तास योग प्राणायाम करतो. परदेशात किंवा बाहेर गेल्यावरही माझा हा दिनक्रम ठरलेला आहे. आहाराच्या बाबतीत आता शाकाहारी आहे. राजीव दीक्षित यांच्यामुळे आहाराविषयीचे बरेच ज्ञान घेता आले. तेच फॉलो करीत आहे. पहाटे उठल्यानंतर तोंड धुण्यापूर्वी दोन ग्लास पाणी पितो. याचाही शरीराला फायदा होत आहे.

Shivaji Patil Kavhekar  .jpg
Karuna Munde: करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या, त्यांनी मला सोडलं नाही, तर...

सकाळी ब्रेकफास्ट व दुपारी जेवण घेतो. रात्रीच्या वेळी मात्र जेवणाऐवजी फळ किंवा हालके अन्न घेतो. निरव्यसनी जीवन जगण्याचा आनंद घेत आहे. महर्षी पतंजली यांनी योगाची सुरवात केली. स्वामी रामदेव बाबा यांनी योगाला उंची प्राप्त करुन दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जग मान्यता मिळवून दिली. योगाचे महत्व आता सर्वांनाच पटले आहे. लातूर येथे गेल्या ३५ वर्षापासून स्वामी डॉ. देवव्रत आचार्य यांचे मी योगासन शिबिर दरवर्षी घेत आहे. या शिबिराच्या माध्यमातून हजारो नागरिकांना योग साधक बनवता आले याचे समाधान आहे

जगात मोबाईल क्रांती झाली आहे. मोबाईलच्या माध्यमातून प्रचंड माहिती मिळत आहे. योगाची देखील भरपूर माहिती यातून मिळते. त्याचाही उपयोग होत आहे. योग हा प्राचीन आहे. तो कोणत्या एका जाती धर्माचा नाही. आपण जसे हवा, पाणी घेतो तसेच रोज योग घेतला पाहिजे. हाच वारसा घरातील मुलेही जपत आहेत.

Shivaji Patil Kavhekar  .jpg
Prashant Paricharak : प्रशांत परिचारकांच्या निष्ठेची फडणवीसांनी केली कदर; दुःखाच्या प्रसंगात दिला मोठा आधार!

योग, प्राणायाम हीच माझ्या फिटनेसची शक्ती आहे. त्यामुळे राजकारण असो किंवा इतर क्षेत्रात काम करताना कधीच थकवा जाणवत नाही. रात्रंदिवस काम करीत राहिलो तरी ऊर्जा कायम असते. समाजात फिरताना अनेक जण भेटतात. त्यांना ही योग, प्राणायाम करुन आनंदी जीवन जगण्याचा सल्ला देण्याचा माझा प्रयत्न असतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com